Friday, April 26, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादमध्ये बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या

औरंगाबादमध्ये बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या

औरंगाबाद – aurangabad

शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक (construction professional) अनिल आग्रहारकर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी सकाळी ही घटना समोर आली असून या आत्महत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यांच्या आत्महत्येने औरंगाबादच्या बिल्डर लॉबीमध्ये (Builder Lobby) एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

Visual Story ; हि अभिनेत्री म्हणते ‘मैं जहाँ रहूँ…मैं कहीं भी हूँ… तेरी याद साथ है’…

अनिल आग्रहारकर (55) हे कुटुंबासह जवाहर नगर परिसरातील उल्कानगरी येथे वास्तव्यास होते. शहरातील बांधकाम क्षेत्रात त्यांचे नाव अग्रस्थानी होते. शहरात विविध ठिकाणी त्यांचे मोठ्या स्वरूपात गृहप्रकल्प तसेच व्यवसायिक प्रकल्प सुरू आहेत. त्यात प्रामुख्याने उल्कानगरी, गारखेडा, सूत गिरणी चौकात त्यांचे प्रकल्प सुरू आहेत. गेल्या काही वर्षांत ते यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून अग्रस्थानी होते. गतवर्षी क्रेडाई या नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या कोषाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

अनिल आग्रहारकर हे बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे ते कुटुंबासोबत संवाद साधून त्यांच्या खोलीत झोपण्यासाठी गेले. सकाळी साडेआठ वाजता मात्र ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. कुटुंबाने तात्काळ त्यांना फासावरून उतरून रुग्णालयात दाखल केले. दहा वाजता मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र आर्थिक कारणातून त्यांनी हे पाऊल उचलल्याची शहरात चर्चा आहे.

Visual Story ; हि अभिनेत्री म्हणते ‘मैं जहाँ रहूँ…मैं कहीं भी हूँ… तेरी याद साथ है’…

- Advertisment -

ताज्या बातम्या