Thursday, May 9, 2024
HomeUncategorized'पन्नास खोक्या'च्या घोषणा देणारे हायकोर्टात

‘पन्नास खोक्या’च्या घोषणा देणारे हायकोर्टात

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

शिवसेना  (Shiv Sena) (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या धरणगाव (dharangaon) येथील पदाधिकार्‍यांनी २२ मार्च २०२३ रोजी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांच्या ताफ्यावर कापूस फेकून व रिकामे खोके दाखवून ‘पन्नास खोके एकदम खोके’ अशा घोषणा देत तीव्र निषेध नोंदवून अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली असून न्यायमूर्ती मंगेश पाटील व न्यायमूर्ती अभय वाघवसे यांनी पोलीस प्रशासनाला तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

गेल्या महिन्यात कृषी मंत्री अब्दुल सतार अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात दौऱ्यावर आले असता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री सत्तार यांच्या ताफ्यावर कापूस फेकून, रिकामे खोके दाखवून ‘पन्नास खोके एकदम खोके’ अशा घोषणा देत तीव्र निषेध नोंदवला होता. गारपीटग्रस्त शेतकयांच्या शेतजमिनीचे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत अदा करावी. कापसाला प्रतिक्विंटल १० ते १२ हजार इतका भाव मिळावा अशा मागण्याचे निवेदन न स्वीकारता मंत्र्यांचा ताफा पुढे गेल्याने निषेध व्यक्त करत सदर घोषणाबाजी करण्यात आली होती.

सरकारतर्फे फिर्यादी होत पोलीस नाईक मिलिंद सोनार यांनी धरणगाव पोलीस स्टेशन येथे बेकायदेशीर जमाव दंगा करणे आदी कलामांतर्गत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गुलाब वाघ, नीलेश चौधरी, भागवत चौधरी, अँड. शरद माळी, राजेंद्र ठाकरे, विजय पाटील, विलास वाघ, महेंद्र चौधरी, भरत महाजन, गणेश मराठे, राहूल महाजन, बापू महाजन आणि माधव सूर्यवंशी या १३ पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर गुन्हा हा पालकमंत्री यांच्या दबावापोटी नोंदविल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अँड. शरद माळी यांनी सदर गुन्हा रद्द व्हावा, अशी विनंती करणारी फौजदारी रीट याचिका अँड. भूषण महाजन यांच्यामार्फत खंडपीठात दाखल केली असून पुढील सुनावणी २८ जून रोजी ठेवण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या