औरंगाबाद पोलिसांनी पकडला साडेअकरा लाखांचा गांजा

मोठी कारवाई यशस्वी
औरंगाबाद पोलिसांनी पकडला साडेअकरा लाखांचा गांजा

औरंगाबाद - aurangabad

औरंगाबादेत गांजाची विक्री करण्‍यासाठी आलेल्या टोळीला शहर पोलिसांनी (police) जेरबंद करुण त्यांच्या ताब्यातून 34 किलो गांजा आणि इनोव्हा कार (Innova car) मिळून सुमारे 11 लाख 30 हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्‍यात आला.

औरंगाबाद पोलिसांनी पकडला साडेअकरा लाखांचा गांजा
एक दिवस शेतकऱ्यांसोबत ; कृषी मंत्र्यांचा उपक्रम

बेगमपुरा पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, अम्रपाली नगर विद्यापीठ गेट समोर इनोव्हा कारमध्ये काही जण गांजा विक्रीसाठी आणणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या पथकाने अम्रपाली नगर विद्यापीठ गेटसमोर फॉरेंन्सीक एक्सपर्ट टीमसह सापळा लावून कारची वाट पाहत असतानाच त्यांना एक इनोव्हा कार येताना दिसली.

पोलिसाच्या पथकाने गाडी त्यांना गाडी थांबवण्याचा इशारा करताच त्यातील आरोपींनी गाडी थांबवून पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून चौघांना ताब्यात घेतल्यावर गाडीची तपासणी केली असता, गाडीमध्ये 4 लाख 8 हजार 228 रुपये किंमतीचा 34 किलो गांजा आढळून आले. सोबतच 7 लाखांची इनोव्हा कार एमएच 20 सीएस 6777, आणि 22 हजारांचे 4 मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 11 लाख 30 हजार रुपये किंमतीचा ऐवज मिळून आला.

पोलिसांनी विचारपूस करून चौकशी केली असता त्यांचे सुरेश रावसाहेब सागरे (वय- 24 वर्षे, धंदा- ड्रायवर, रा. सुरेवाडी, औरंगाबाद), सागर भाऊसाहेब भालेराव (वय- 25 वर्षे, रा. वाघलगाव, ता. फुलंब्री), संदेश दिलीप ठाकुर (वय- 24 वर्षे, रा. मयुरपार्क औरंगाबाद), शंकर भीमराव काकडे (वय- 24 वर्षे, रा. अम्रपाली नगर, विद्यापीठ गेटसमोर औरंगाबाद) असे नाव असून याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com