Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedअन्ननलिकेतून काढली मोठी गाठ

अन्ननलिकेतून काढली मोठी गाठ

औरंगाबाद – aurangabad

अगदी ९९ टक्के आपण अन्ननलिकेतील (Esophagus) कर्करोग (Cancer) या आजाराविषयी ऐकून आहोत. केवळ एक टक्का लोकांमध्ये अन्ननलिकेत स्नायूंपासून तयार होणाऱ्या साध्या गाठी (esophageal leiomyoma) आढळून येतात. या गाठी मुख्यत्वे पुरुषांमध्ये (२:१) जास्त आढळून येतात. तसेच साधारणतः २० ते ५० वर्षे वयोगटात या गाठी पाहायला मिळतात. 

- Advertisement -

visual story गौरीचा मॉर्डन लुक चर्चेत

अन्ननलिकेच्या कर्करोगामध्ये दिसणाऱ्या लक्षणांप्रमाणेच अन्न गिळण्यास त्रास होणे, छाती दुखणे, छातीत जळजळ होणे, खोकला येणे तसेच वजन कमी होणे यासारखी लक्षणे आढळून येतात. रुग्णास लक्षण आढळून आल्यास अथवा आकार मोठा (५ सेंटीमीटरपेक्षा जास्त) असल्यास उपचार करणे आवश्यक असते. पूर्वीच्या काळी बेरियम तपास, सिटी स्कॅन आणि एंडोस्कोपी तपासणी द्वारे निदान केले जात होते. ज्याद्वारे इतर आजारांसोबत तुलना करणे प्रत्येकवेळी शक्य होत नव्हते. अथवा खात्रीपूर्वक निदान करणे अवघड होत असत. उपचारांमध्ये गाठ काढणे आणि बहुतांशी वेळा फक्त गाठ काढणे शक्य नसल्यामुळे अन्ननलिका पूर्णतः काढावी लागत होती आणि जठरा द्वारे पुन्हा नवीन ट्यूब बनवून तिला जोडले जात असत. अन्ननलिका पूर्णतः काढल्यामुळे नेहमीसाठी त्या रुग्णाला खाण्याचा, झोपण्याचा आणि पचनाचा त्रास होत असत. 

असाच आजार घेऊन २८ वर्षांची बीड येथील तरुणी जीआय वन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाली. नव्या पद्धतीच्या एंडोस्कोपी अल्ट्रासाऊंड दुर्बिणी द्वारे मेडिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. अशोक मोहिते यांनी तपासणी करून अन्ननलिकेतील गाठीचा तुकडा घेऊन लियोमायोमा असल्याचे खात्रीलायक निदान केले. त्यात गाठीचा आकार ८-१० सेंटीमीटर आणि ती गाठ अन्ननलिकेभोवती गोलाकार पसरली असल्याचे आढळून आले. सिटी स्कॅन आणि पेट सिटी तपासणी करून गाठ छातीच्या खालच्या भागात हृदयाच्या बाजूला तसेच जठरापर्यंत पोहोचल्याचे निदान झाले. सामान्यतः अशा रुग्णांना खुल्या शस्त्रक्रिये द्वारे अन्ननलिकेसोबत काढावे लागते. परंतु, अन्ननलिका काढावी लागल्यास होणाऱ्या त्रासाचा विचार करून आणि रुग्णाचे वय कमी असल्यामुळे तिचे कुटुंब पूर्ण नसल्यामुळे हायब्रीड शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. संदीप भालसिंग, डॉ. अशोक मोहिते आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी घेतला. 

जीआय वन हॉस्पिटलमध्ये मराठवाड्यात प्रथमच अशा प्रकारची शस्त्रक्रिया करून दुर्बिणी द्वारे अन्ननलिकेची मोठी गाठ हायब्रीड शस्त्रक्रिये द्वारे काढण्यात आली. शिवाय अन्ननलिका वाचवण्यातही यश आले असल्याने वैद्यकीय क्षेत्रात जीआय वन हॉस्पिटल आणि टीमचे कौतुक करण्यात येत आहे. 

visual story गौरीचा मॉर्डन लुक चर्चेत

- Advertisment -

ताज्या बातम्या