कौतुकास्पद...सामाजिक संस्थांना मदतीचा हात

सोहळा टाळत वृद्धाश्रमांना वाढदिवस भेट
कौतुकास्पद...सामाजिक संस्थांना मदतीचा हात

औरंगाबाद - Aurangabad

पंचाहत्तरावा वाढदिवस (Birthday) म्हणजे आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा. निवृत्त शिक्षक जयप्रकाश जोशी यांच्या कुटूंबियांचा यानिमीत्ताने मोठा सोहळा आयोजित करण्याचा मानस होता. मात्र, उभ्या जगावर असणारे (Corona) कोरोनाचे संकट लक्षात घेता जोशी यांनी त्यास नकार दिला आणि वाढदिवस साधेपणाने साजरा करत यातून वाचलेली रक्कम ५ बालगृहे, वृद्धाश्रम आदी सामाजिक संस्थांना भेट दिली.

परभणी येथील जयप्रकाश अच्युतराव जोशी आणि मंगला जोशी निवृत्तीनंतर (Aurangabad) औरंगाबादमध्ये स्थायिक झाले आहेत. त्यांचा मुलगा पवन पुण्यात तर मुलगी गौरी उमरीकर मुंबईत आहे. (Lockdown) लॉकडाऊन संपल्यामुळे समारंभांना परवानगी आहे. यामुळे मंगल कार्यालयामध्ये वडीलांचा ७५ वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याचे मुलांनी नियोजन केले. परंतू सामाजिक भान जागे असणारे जयप्रकाश जोशी यांनी त्यास नकार देत हा खर्च सामाजिक संस्थांना भेट देण्याचे ठरवले.

पाच संस्थांना भेट

कोरोनाच्या काळात बालगृहांना मदतीचा ओघ थांबला आहे. काहींना शासनाचे अनुदान मिळण्यात अडचण येत आहे. जोशी यांनी अशा गरजू संस्थांची माहिती घेतली. यातून नितीन वाकुडे आणि मनोज वाकुडे यांचे शिवशंकर कॉलनी येथील धर्मवीर राजे संभाजी एड्सग्रस्त मुला-मुलींचे बालगृह, उस्मानपुरा येथील जयराज नारायणकर आणि कमल नारायणकर यांचे गजाजन बालगृह (बालसदन), वैजापूर येथील मंगल खिवंसरा आणि शांताराम पंदेरे यांचा लोकपर्याय प्रकल्प, समर्थनगर येथील मालती करंदीकर यांचे मुक्तीसोपान वृद्धाश्रम आणि वाळूज येथील श्रीकांत देशमुख यांच्या सावली बालगृहाची निवड केली. त्यांना वाढदिवस साजरा करण्यासाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम विभागून चेकद्वारे भेट दिली. याप्रसंगी त्यांच्यासोबत मंगला जोशी होत्या.

बालगृहात वाढदिवस साजरा

बालगृहात जोशी दाम्पत्याचे जोरदार स्वागत झाले. एड्सग्रस्त मुलांच्या बालगृहात मुलांनी एकांकिका साजरी केली. गजानन बालगृहात मुलांनी गाण्यातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सावलीमध्ये केक कापून धूमधडाक्यात वाढदिवस साजरा झाला. अचानक साजरा झालेल्या या वाढदिवसाने जोशी दाम्पत्य भावुक झाले. वाढदिवस साजरा करण्यातून मिळालेल्या आनंदापेक्षा हा आनंद कितीतरी पट अधिक होता. गरजूंना मदत केल्याचे समाधान शब्दात व्यक्त करता येत नसल्याचे जयप्रकाश जोशी म्हणाले. संकटाच्या काळात मदत मिळाल्याने संचालकांनी त्यांचे आभार मानले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com