Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedकोकणातील पूरग्रस्तांच्या दारापर्यंत पोहचवला मदतीचा हात

कोकणातील पूरग्रस्तांच्या दारापर्यंत पोहचवला मदतीचा हात

औरंगाबाद – Aurangabad

कोकणातील महापूरात नुकसान झालेल्या नागरीकांच्या मदतीसाठी औरंगाबादचे “सेवा फाऊंडेशन’ (Service Foundation) सरसावले आहे. फाऊंडेशनने पाली, कराड आणि चिपळूनमध्ये किराण्याच्या १९ वस्तूंचा समावेश असणाऱ्या ६७५ कीटसह भांडे, कपडे आणि जीवनोपयोगी साहित्य कोकणी बांधवांच्या दारापर्यंत पोहचवले. फाऊंडेशनने कोणी पोहचू न शकलेल्या भागात मदतीचा हात दिला.

- Advertisement -

कोकण (Konkan) केवळ पर्यटनासाठी नसून महापूराच्या संकटात कोकणवासीयांना मदत करणे आपली जबाबदारी असल्याची भूमिका सेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुमित खांबेकर यांनी मांडली. “आपलं कोकण, आपली माणसे’ या उपक्रमाच्या माध्यमातून मदत साहित्यासाठी आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत फाऊंडेशनच्या सदस्यांकडून मदतीचा ओघ सुरू झाला.

६७५ कुटूंबांना महिनाभराचा किराणा
फाऊंडेशनने गहू, तांदूळ, तूरदाळ, साखर, चहापत्ती, गोडतेल, बिस्कीट, नूडल्स, साबण, टूथपेस्ट, ब्रश याच्यासह १९ वस्तूंचा समावेश असणारे ६७५ बॉक्स कोकणात पाठवले. याशिवाय भांडे, नवा कोऱ्या साड्या, कपडे, शर्ट, पँट असे साहित्य गरजंूपर्यंत पोहचवले.

दुर्लक्षीत गावात मदत

पूरग्र्रस्तांना मदत सुरू झाली असली तरी अनेक गावे अजूनही वंचित आहे. फाऊंडेशनने जिल्हाधिकाऱ्यांकडून अशा गावांची माहिती घेतली. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील कराड, पाली आणि चिपळूनमधील शंकरवाडी, खेर्डी, वडार कॉलनी, पेठमाप, सती या गावांची निवड केली. शनिवारी रात्री मदतीचा ट्रक कोकणासाठी रवाना झाला. रविवार आणि सोमवारी साहित्याचे वितरण करण्यात आले. पावसात, चिखलात येण्याचा त्रास वाचावा यासाठी गावाच्या चौकात ट्रक उभा करून स्वंयसेवकांनी नागरीकांच्या घरापर्यंत मदत पोहचवली.

यांचे मिळाले सहकार्य
फाऊंडेशनचे अध्यक्ष सुमित खांबेकर, नितीन महाजन, प्रतीक गायकवाड, शेखर पाटील, गणेश तुपे, आशिष भालेराव, आमिर खान, स्वाती डिडोरी पाटील, नेहा गुंडेवार, जय वावरे, सुजीत तेंगुरे, विजय वावरे, राहुल टेटवार, शुभम लोहाडे, आशिष पावडे, समीर पाटोळे, गजानन गोमटे, शैलेश पवार आदी.

- Advertisment -

ताज्या बातम्या