Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedसंथ काम करणाऱ्या ठेकेदाराला दररोज सव्वा लाखाचा दंड!

संथ काम करणाऱ्या ठेकेदाराला दररोज सव्वा लाखाचा दंड!

औरंगाबाद- Aurangabad

तीन वर्षांपूर्वी शहरासाठी नवीन पाणीपुरवठा (Water supply) योजनेचे काम सुरू झाले. सुरुवातीला कामाची गती घेतलेल्या ठेकेदाराचे मागील वर्षभरापासून काम एकदम थंडावले आहे. मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही कामाला गती मिळाली नाही. त्यामुळे ठेकेदार जीव्हीपीआर कंपनीला (GVPR Company) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आणखी एक नोटीस बजावली आहे. कामाची गती वाढवा, अन्यथा निविदेतील अटी-शर्तीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

- Advertisement -

राज्य शासनाने मंजूर केलेल्या शहराच्या १६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा (Water supply) योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून सुरू आहे. प्राधिकरणाने पहिल्या टप्प्यातील १३०८ कोटी रुपयांच्या कामांची निविदा हैदराबाद (Hyderabad) येथील जीव्हीपीआर कंपनीला (GVPR Company) दिली. पण कंपनीचे काम संथगतीने सुरू असल्याने राज्य शासन, जीवन प्राधिकरणामार्फत वारंवार तंबी दिली जात आहे. त्यानंतरही कामाची गती वाढत नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, २४ जून रोजी पुन्हा एकदा जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता आर. एस. लोलापोड यांनी नोटीस बजावली. त्यात म्हटले आहे की, जायकवाडी धरणातील (Jayakwadi dam) उद्भव विहिरीचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. सध्या सुरू असलेले माती परीक्षणाचे काम जुलैअखेरीस पूर्ण करावे. मुख्य पाइपलाइनसाठी ऑक्टोबर २०२१ पासून पाइप तयार करणे अपेक्षित होते, पण एप्रिल २०२२ च्या पहिल्या आठवड्यापासून पाइपनिर्मिती सुरू झाली. पाइपलाइनचे (Pipeline) काम गतीने करण्यासाठी कोणतेही नियोजन नसल्याचे दिसून येत आहे.

जलशुद्धीकरण केंद्राच्या कामासाठी अपुरे मनुष्यबळ, अनुभव नसलेले अभियंता व नियोजनाचा अभाव दिसतो. संतुलित जलकुंभाचे १४ महिने उलटल्यानंतरही खोदकाम पूर्ण झालेले नाही. अंतर्गत पाइप मनपाने ठरवून दिलेल्या ठिकाणी तातडीने टाकण्यात यावेत, असे नोटिशीत नमूद केले आहे. संपूर्ण कामासाठी एकच प्रकल्प व्यवस्थापक नेमला आहे. त्यांच्याकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात कामांचे व्यवस्थापन शक्य नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या अनुभवी वेगवेगळा प्रकल्प सल्लागार नेमण्यात यावा, असेही नोटिशीत म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या