परस्पर पत्नीची बँक डिटेल्स घेणाऱ्याला ठोकल्या बेड्या

परस्पर पत्नीची बँक डिटेल्स घेणाऱ्याला ठोकल्या बेड्या

छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar


बनावट स्वाक्षऱ्या (signatures) व बँकेच्या (Bank) बनावट रबरी शिक्क्याच्या आधारे पत्नीच्या संमतीशिवाय तिच्या बँक खात्यांची माहिती काढणाऱ्या पतीला चिकलठाणा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रामेश्‍वर भारत केदार (३२, रा. मोगलवाडी, खोपोली, ता. खालापूर जि. रायगड) असे आरोपी पतीचे नाव असून त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.एच. खेडकर यांनी दिले.

चिकलठाणा परिसरात राहणाऱ्या २८ वर्षीय विवाहीतेने याबाबत फिर्याद दिली. पीडिता चार वर्षांपासून माहेरी राहत आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पतीविरोधात हुंडाबळीप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर घरगुती हिंसाचार आणि घटस्फोटाचे न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. दरम्यान, आरोपीने १९ एप्रिल २०२२ रोजी पीडितेच्या एमआयडीसी वाळूज येथील मोरे चौकातील आयडीबीआय बँकेच्या खात्याच्या मागील दोन वर्षांचे स्टेटमेंट, २४ एप्रिल २०२२ रोजी पीडितेच्या सिडको येथील आयसीआयसीआय बँक खात्याची मागील दोन वर्षांचे स्टेटमेंट आणि ३० मे २०२२ रोजी सिडको येथील एसबीआय बँकेच्या खात्यातील मागील चार वर्षांपासूनचे बँक स्टेटमेंट व डिटेल्स काढल्या. त्यासाठी आरोपीने पीडितेच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या. तसेच बँकेचे बनावट रबरी शिक्के आणि बँक अथॉरिटीजच्या बनावट स्वाक्षऱ्या करून बनावट दस्तऐवज बनवले. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


आरोपीने गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज केला असता न्यायालयाने तो फेटाळून लावला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेत अटक केली. त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता सहायक सरकारी वकील नीता कीर्तीकर यांनी गुन्ह्यात आरोपीने बँक खात्याचे स्टेटमेंट नेमके कोठून काढले, त्यावर बँकेच्या नावाचे स्टॅम्प कोठे तयार केले, याचा तपास करायाचा असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com