गर्दी जमवल्याने सत्ताधारी आमदाराविरुद्ध गुन्हा

जलवाहिनीचे भूमीपूजन आले अंगलट
गर्दी जमवल्याने सत्ताधारी आमदाराविरुद्ध गुन्हा

औरंगाबाद - Aurangabad

बजाजनगर येथे जलवाहिनीच्या भूमिपुजनासाठी गर्दी जमवल्या प्रकरणी आमदार संजय शिरसाठ यांच्यासह पस्तीस ते चाळीस पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. परिसरात करोना रुग्णांचे प्रमाण वाढत असताना सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने नियम तोडून गर्दी जमवत स्वतः सह इतरांचा जीव धोक्यात घालून सुरक्षित वावर ना करता कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेतला. परिसरात संचारबंदी असूनही बजाजनगरातील जयभवानी सोसायटीत नवीन जलवाहिनीचे भूमीपूजन झाले.

आमदार शिरसाट यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला. सरपंच सचिन गरड, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, तालुका प्रमुख हनुमान भोंडवे, बबन सुपेकर, कृष्णा राठोड, कैलास चव्हाण, सुनील काळे, जितेंद्र जैन, कैलास भोकरे, पोपट हंडे, शिल्पा नरवडे, नीलेश सोनवणे, अंबादास जाधव, प्रेमदास रगडे, संतोष निकम, मारुती साठे, अर्चना जाधव, सुनीता गाडे, शिल्पा नरवडे, सविता काकडे व इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

डावात माचाळा पार्टीचे कार्याध्यक्ष भारत फुलारे यांनी या प्रकरणी पोलिस आयुक्तांना निवेदन दिले होते. अंमलदार विनोद नितनवरे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन पागोटे तपास करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com