धक्कादायक…! हत्या करून मृतदेहाला घातली चक्क आंघोळ

ढोरकीन गावातील घटना
धक्कादायक…! हत्या करून मृतदेहाला घातली चक्क आंघोळ

औरंगाबाद - Aurangabad

शेतात वाचमन असलेल्या 25 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर मारेकऱ्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने घटनास्थळाला धुतले व मृतदेह देखील धुतल्याचा धक्कादायक प्रकार पहाटे घडला आहे.

मृत संदीप हा औरंगाबाद (Aurangabad) शहरातील आंबेडकरनगर (Ambedkar Nagar) भागातील रहिवाशी होता. तो ढोरकीन येथील एका शेतात वाचमन म्हणून कामाला होता. आठवड्यातून किंवा पंधरवड्यातून तो औरंगाबादेत यायचा त्याच्या सोबत शेतात अजून दोन तरुण राहायचे.

पहाटे शेतातून जात असताना नागरिकांना संदीप सूर्यभान साळवे (वय 25) घराबाहेर पडलेला दिसला व डोक्यावर गंभीर जखमा दिसून आल्या ही माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच एमआयडीसी पैठण पोलीस (MIDC Paithan Police) घटनस्थळी दाखल होऊन फॉरेन्सिक पथकाला पाचारण करून पाहणी केली असता घर धुतलेल्या अवस्थेत आढळून आले तर काही ठिकाणी रक्त आढळून आले. तर मृतदेह देखील धुतलेले होते.

आरोपीनी मध्यरात्रीच्या सुमारास संदीपची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली असावी व त्यानंतर पुरावा नष्ट करण्याचा हेतूने घरातील रक्त धुण्याचा प्रयत्न केला असावा व त्यानंतर मृतदेह घराबाहेर आणून मृतदेह धुण्यात आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com