Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedजायकवाडी @83 ; नाशिकडून पाण्याचा ओघ मंदावला

जायकवाडी @83 ; नाशिकडून पाण्याचा ओघ मंदावला

औरंगाबाद – aurangabad

जायकवाडी धरणातील (Jayakwadi Dam) पाणीसाठ्याबाबत (Collector Sunil Chavan) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आढावा घेतला. धरणातील पाणीसाठा 90 टक्के पूर्ण झाल्यानंतरच धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन जलसंधारण विभागाने (Department of Water Conservation) करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

- Advertisement -

जायकवाडी धरणातील आजचा पाणीसाठा 1749 दलघन.मी असून तो 1953 दल घन मी झाल्या नंतरच म्हणजेच 90 टक्के साठा झाल्या नंतर उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. तसेच पुढील काही दिवसात धरणात येणारा पाणीसाठा लक्षात घेता परिस्थितीनुसार पाण्याचा विसर्ग करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

धरण जलाशय प्रचलन आराखड्यानुसार पाणीपातळी कायम ठेवण्याच्या उद्देशाने जायकवाडीच्या नाथसागरातून मंगळवारी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. सध्या जलविद्युत केंद्रातून १ हजार ५८९ क्यूसेक क्षमतेने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून वरच्या भागातून पाण्याची आवक वाढल्यास यामध्ये वाढ करण्यात येणार असल्याची माहिती धरण नियंत्रण कक्षांतून देण्यात आली. धरणाच्या उर्ध्व भागातील धरणातून गेल्या नऊ ते दहा दिवसांपासून विसर्ग सोडण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यानुसार पाण्याचा विसर्ग केला जात असून हे पाणी टप्प्याटप्प्याने नाथसागरात दाखल होत आहे. यात मागच्या दोन दिवसांपासून धरणात येणारी पाण्याची आवक मंदावली आहे.

पैठण, गंगापूर, वैजापूर (Paithan, Gangapur, Vaijapur) तालुक्यातील नदीकाठच्या गावातील नदीच्या धोक्याची पाणी पातळी निश्चीत करण्यासाठी ब्ल्यू- लाईन मार्किंग करण्याचे निर्देश देवून सदरील खर्चास जिल्हा नियोजन समितीकडून निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे या बैठकीत चव्हाण यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या