मराठवाड्यातील ८० टक्के पोलिसांनी घेतली पहिली लस 

१४६ अधिकारी आणि १५५१ अद्याप बाकी   
मराठवाड्यातील ८० टक्के पोलिसांनी घेतली पहिली लस 
लस

औरंगाबाद - Aurangabad

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मराठवाड्यातील बाधितांचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये पोलिस बाधित होण्याचेही प्रमाण अधिक आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या कार्यक्षेत्रातील औरंगाबाद ग्रामीण, जालना, बीड आणि उस्मानाबाद परिसरात अधिकाऱ्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

चार विभागांतर्गत लसीकरणाचा पहिला डोस साडेतीन हजारांच्यावर पोलिस अंमलदार आणि अधिकाऱ्यांनी घेतला आहे.गेल्या वर्षभरापासून पोलिस कर्मचारी करोना रोखण्यासाठी कर्तव्य बजावत आहेत. गेल्या वर्षी लॉकडाउन काळात करोनारूग्ण शहरी भागात आढळत होते. ग्रामीण भागात ही संख्या कमी होती.

यंदाच्या करोना लाटेत ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षक के.एम. एम. प्रसन्ना यांनी लसीकरण वाढविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार औरंगाबाद ग्रामीण, बीड, जालना आणि उस्मानाबाद येथील एकूण ४८१ पोलिस अधिकारी आणि ६२०५ पोलिस अंमलदारांनी पहिली लस घेतली. २८७ पोलिस अधिकारी आणि ३४१९ पोलिस अंमलदारांनी दुसरी करोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे.

सध्या विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील चार विभागांतर्गत १४६ अधिकारी आणि १५५१ कर्मचारी यांनी करोनाची लस घेतली नसल्याचे समोर आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com