औरंगाबादमध्ये ७८९ मंडळाची नोंद

jalgaon-digital
2 Min Read

औरंगाबाद – aurangabad

यंदाच्या वर्षी गणेश मंडळ (Ganesha Mandal) नोंदणी मोफत करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. यंदा पोलिस (police) विभागाकडे गणेश मंडळाची यंदा ऑनलाइन नोंदणी (Online registration) करण्यात आहे. यंदा शहरातील ७८९ गणेश मंडळाने अधिकृत ऑनलाइन नोंदणी तसेच महापालिकेकडे (Municipality) २६० महामंडळाने नोंदणी केली असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यात यंदा निर्बंधमुक्त गणशोत्सव साजरा करण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी शहरातील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठकीत तसेच पत्रकारांशी चर्चा करताना, गणेश मंडळांना यंदा ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. पोलिस आयुक्तांनी केलेल्या आवाहनाला शहरवासीयांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत गणेश मंडळाची नोंदणी गणेश महासंघाच्या कार्यालयात केली जात होती. या गणेश मंडळाच्या नोंदणीसाठी त्यांच्याकडून विशिष्ट शुल्क आकारणी केली जात होती. यंदा गणेशोत्सव साजरा करताना, गणेश मंडळाची नोंदणी मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे यंदा गणेश मंडळ्याने आपापल्या गणेश मंडळाची ऑनलाइन नोंदणी केली आहे. गणेश महासंघात गणेश मंडळाच्या नोंदणीसाठी आलेल्या मंडळांनाही ऑनलाईन नोंदणी करण्याबाबतसूचना करण्यात येत आहे.

या नोंदणीसाठी शहर पोलिस विभागाकडून विशेष कर्मचारी नेमण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांनी मंडळाच्या सदस्यांना मार्गदशन केल्यानंतर अनेक मंडळांनी आपले अज ऑनलाइन नोंदणी केली. काही मंडळाने दिलेल्या अर्जाच्या माध्यमातून शहर सायबर पोलिस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदर अर्ज नोंदणीकृत करून पुढील कारवाई केली. आगामी काही दिवसात शहरातील नोंदणीकृत गणेश मंडळाची संख्या हजारापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *