यंदा इंजिनिअरिंगची 63 महाविद्यालये होणार बंद!

रिक्त जागांची संख्या वाढली 
यंदा इंजिनिअरिंगची 63 महाविद्यालये होणार बंद!

औरंगाबाद - Aurangabad

मागील काही वर्षांपासून इंजिनिअरिंग (Engineering) अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. देशात 2015-16 पासून काही अभियांत्रिकी महाविद्यालये (Colleges of Engineering) बंद व्हावीत, यासाठी अर्ज करत आहे. 2015-16 पासून दरवर्षी किमान 50 अभियांत्रिकी महाविद्यालये बंद पडली आहेत. त्यात यंदा 63 महाविद्यालये बंद पडणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

आता बारावीचा निकाल घोषीत झालेला आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशाचे वेध लागलेले आहे. लवकरच विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. या (CET) सीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश मिळणार आहे. मराठवाड्यातील इंजिनिअरिंगच्या 30 संस्थांमध्ये तब्बल 8 हजार 831 जागा उपलब्ध आहे. त्यामुळे (HSC) बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना यंदा इंजीनियरिंगला प्रवेश घेण्याची मोठी संधी आहे.

मागील चार वर्षांपासून (Engineering) इंजिनिअरिंगला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या घटत आहे. विद्यार्थी अभावी अनेक संस्था बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे संस्था देखील विद्यार्थ्यांच्या शोधात आहे.

यंदा बारावीत विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास झाले आहेत. त्यामुळे इंजिनिअरिंगला प्रवेश घेणार्‍यांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. परंतु, बारावी उत्तीर्ण होऊन आता विद्यार्थ्यांना सीईटी द्यावी लागणार आहे. सीईटीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. अनेक विद्यार्थ्यांनी सीईटीचे अर्ज भरले असून सीईटीच्या परीक्षेची तयारी विद्यार्थी करत आहे. मरठावाड्यातील (Engineering) इंजिनिअरिंगच्या 30 संस्थांमध्ये यंदा तब्बल 8 हजार 831 जागा उपलब्ध आहे. त्यामुळे, यंदा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना (Engineering) इंजिनिअरिंगला प्रवेश घेता येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com