होम आयसोलेशनचे ६० रुग्ण रुग्णालयात दाखल 

jalgaon-digital
1 Min Read

औरंगाबाद – Aurangabad

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे रुग्णालयातील बेड्स कमी पडत आहेत. त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्यांना होम आयसोलेशन करून त्यांच्यावर घरीच उपचार केले जात आहेत. मात्र या सेवेचा लाभ घेणारे काही रुग्ण अचानक गंभीर होत असल्याने त्यांना ऐनवेळी रुग्णालयात हलवावे लागत आहे. आजवर महापालिकेला प्राप्त झालेल्या माहितीवरून 60 रुग्णांना रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांनी दिली.

मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने शहरासह जिल्ह्यात थैमान घातले आहे. मध्यंतरी रुग्णसंख्येने उच्चांक गाठत शहरातील सर्व खासगी, सरकारी, पालिका कोविड सेंटर रुग्णांनी हाऊसफुल झाले होते. त्यामुळे शासन निर्देशानुसार पालिकेने सौम्य लक्षणे असलेल्या आणि घरी राहण्याची स्वतंत्र वेगळी व्यवस्था आहे, अशा कोरोना रुग्णांना होम आयसोलेशन करण्याचा निर्णय घेतला.

याअंतर्गत सौम्य लक्षणे असलेल्यांना त्या त्या परिसरातील खासगी डॉक्टरांकडून घरीच उपचार दिले जात आहेत. हा प्रयोग अजूनही सुरूच असून आजवर हजारो रुग्ण घरीच उपचार घेऊन बरे झाले आहेत. मात्र यातील काही रुग्णांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना ऐनवेळी रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. पालिकेकडून नित्याने घरीच उपचार घेत असलेल्या रुग्णांची वॉर रुममधून कॉल करून विचारपुस केली जाते. अशा कॉलमधून आजवर 59 रुग्णांनी होम आयसोलेशनमध्ये तब्येत बिघडल्यानंतर रुग्णालयांत भरती झाल्याचे पालिकेला कळवले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *