Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedमार्चपासून औरंगाबादकरांना ५ जी सेवा 

मार्चपासून औरंगाबादकरांना ५ जी सेवा 

औरंगाबाद Aurangabad

देशातील २०० शहरांची पहिल्या टप्प्यात फाइव्ह-जी सेवा (5G service) देण्यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यात ३१ मार्चपूर्वी (March) औरंगाबादचा समावेश केला असल्याची माहिती केंद्रीय तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव (Union Technology Minister Ashwini Vaishnav) यांनी दिली. आपल्या भाषणात त्यांनी औरंगाबादचा ‘छत्रपती संभाजीनगर’ असा उल्लेख केला.

- Advertisement -

ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज अँड ऍग्रीकल्चर’च्या (सीएमआय) वतीने मराठवाडा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी वैष्णव बोलत होते. ते. म्हणाले, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्राची व्याप्ती ५१ लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. या क्षेत्रातील उद्योजकांना मोठी संधी आहे. औरंगाबादमधील पंचतारांकित औद्योगिक परिसराची माहिती देश, परदेशातील उद्योजकांना दिली जाईल. वैष्णव म्हणाले, केवळ तंत्रज्ञानाची ही सेवाच नाही तर टेलिकॉम क्षेत्रात भारताने विकसित उत्पादकांबरेबर औरंगाबादेतील उद्योजकांच्या गाठभेटी घडवून आणल्या जातील. रेल्वे कोच विकासासाठी औरंगाबादेतील ऑटोमोबाईल क्षेत्रातील उद्योजकांना मोठी संथ आहे. काही वर्षात दूरसंचार आणि आतंरजालाच्या क्षेत्रातील अनेक गुंतागुंतीवर मात करत भारताने ‘फोर आणि फाइव्ह जी’ मोठे बदल केले आहेत. आता जगभरातील मंडळी ही सेवा उपलब्ध होते. औरंगाबादचा पहिल्या २०० शहरांत समावेश करून मार्चपासून फाइव्ह-जी सेवा दिली जाईल. ‘कोअर नेटवर्क एरिया, ‘वास’, ‘मास’ या क्षेत्रात जगात मोजक्याच कंपन्या आहेत. पण आता या क्षेत्रात तयार तंत्रास उत्पादकांशी जोडावयाचे आहे. अशा उद्योजकांची यादी तयार केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यामार्फत पाठवा.  यावेळी सीएमआयए अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी औरंगाबाद ओद्योगिक विकासाचे सादरीकरण केले. कार्यक्रमास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुमरे, माजी खासदार राजकुमार धूत, एन. के. गुप्ता, अनिल सावे, नंदकिशोर कागलीवाल, मुनीश शर्मा, प्रशांत देशपांडे, कमलेश धूत, शिवप्रसाद जाजू आदीसह उद्योजक उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या