Friday, April 26, 2024
HomeUncategorizedमराठवाड्यातून ५५८ कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत

मराठवाड्यातून ५५८ कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत

औरंगाबाद – aurangabad

जमीन महसूल (Land revenue) व गौण खनिजातून ३१ मार्चअखेर (Marathwada) मराठवाड्यातून ५५८ कोटी २१ लाख २८ हजार रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत वसुलीचे प्रमाण केवळ ६६.९६ टक्के झाले आहे. महसूल वसुलीत विभागात (Hingoli district) हिंगोली जिल्हा आघाडीवर असून जिल्ह्याने १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. तर औरंगाबाद जिल्ह्याने उद्दिष्टाटच्या तुलनेत ६६.९६ टक्के महसूल प्राप्त केला आहे.

- Advertisement -

(State government) राज्य शासनाला मिळणाऱ्या उत्पन्नापैकी जमीन महसूल, गौण खनिजाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न महत्त्वपूर्ण मानले जाते. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांना मिळून २०२१-२२ या वर्षासाठी जमीन महसूल व गौण खनिजकरातून ८३३ कोटी ६२ लाख रुपयांची वसुली उद्दिष्ट देण्यात आले होते. यात जमीन महसूलातून १५५ कोटी ८८ लाख रुपये तर गौण खनिजातून ६७७ कोटी ७४ लाख रुपये महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. परंतु करोनाचे संकट, निर्बंध तसेच खरीप हंगामात झालेली अतिवृष्टी यासह अन्य कारणांनी यंदा वसुली जेमतेम झाल्याचे चित्र आहे.

(Divisional Commissioner’s Office) विभागीय आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ३१ मार्चअखेर जमीन व गौण खनिजातून एकूण ५५८ कोटी २१ लाख २८ हजार रुपयांचा महसूल गोळा करण्यात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना यश मिळाले आहे.

यात जमीन महसूलातून १४२ कोटी ५४ लाख ६१ हजार रुपये (९१.४५.टक्के) तर गौण खनिजातून ४१५ कोटी ६६ लाख ६७ हजार रुपये (६१.३३ टक्के) महसूल वसुली झाली आहे. हिंगोली जिल्ह्याने दिलेले उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण केले आहे. तर वसुलीत उस्मानाबाद जिल्हा सर्वात पिछाडीवर असून केवळ ४३.३४ टक्के वसूली झाली आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यास महसूल वसूलीचे उद्दिष्ट १५७ कोटी ६३ लाख २९ हजार रुपयांचे असतानाच ३१ मार्च अखेरपर्यंत १०७ कोटी ९१ लाख ५८ हजार रुपयांचा महसूल गोळा केला. उद्दिष्टच्या तुलनेत हे प्रमाण ६८.४८ टक्के ए‌वढे आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या