लॉकडाऊनमध्ये रोखले 52 बालविवाह

औरंगाबाद जिल्हा बाल संरक्षण कक्षाची कामगिरी 
लॉकडाऊनमध्ये रोखले 52 बालविवाह

औरंगाबाद - Aurangabad

कोरोनाचा प्रादर्भाव पुन्हा नव्याने व्यापक झाल्याने संपूर्ण अर्थव्यवस्था व समाजव्यवस्था प्रभावित झालेली आहे. अशा काळात जिल्हयात बालविवाहाचे प्रमाणही वाढत असून या काळात एकुण 52 बालविवाह जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालया अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाने थांबवले आहेत. यात काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना आश्रय, समूपदेशन देण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण तथा अध्यक्ष जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांचे बालविवाह बाबतीत कार्यवाही करण्यातच्या सुचना आहेत. याअंतर्गत बाल कल्याण समिती, पोलीस उपनिरिक्षक, पोलीस अधिक्षक, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, बालविवाह प्रतिबंधक अधिकारी, ग्रामसेवक, बालविकास प्रकल्प अधिकारी, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, ग्राम बालसंरक्षण समिती इत्यादींना आदेशित केलेले आहे. तसेच अक्षय तृतीया मुहूर्तावर राज्यात बालविवाह होणार नाहीत यादृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून कार्यवाही करण्याचे आदेशीत केलेले आहे.

या अंतर्गत जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असलेल्या माहितीच्या आधारे जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी हर्षा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ पथक गठीत करून पोलिसांच्या मदतीने घटनास्थळावर जावुन संबंधीत बालविवाह थांबवून कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करून बाल कल्याण समितीसमक्ष पुढील बालिकेचे पुनवर्सनाकरिता सादर करण्यात येते.

ग्रामीण भागासाठी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणुन ग्रामसेवक आणि सहायक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणुन अंगणवाडी सेविका तसेच शहरी भागासाठी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणुन हे बालविकास प्रकल्प अधिकारी हे 2016 च्या शासनाच्या अधिसूचनेत निर्देशित केलेले आहेत.

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 अन्वये मुलीचे वय 18 वर्षे व मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण होण्याअगोदर त्यांचा विवाह होत असेल तर त्यास बालविवाह संबोधले जाते. असा बालविाह करणे कायदयाने अजामिनपात्र गुन्हा असुन त्यास 2 वर्षे सक्तमजुरी व 1 लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होण्याची तरतूद आहे.

लॉकडाऊन कालावधीत जिल्हयातील 52 बालविवाह थांबविण्यात आले आहेत. यात पैठण 13, सिल्लेाड 8, वैजापुर 1, गंगापुर 8, कन्नड 3, फुलंब्री 7, खुल्ताबाद 1, औरंगाबाद 16, सोयगाव 1 असे एकुण 52 विवाहांचा समावेश होता. औरंगाबाद जिल्ह्यातील अशा बालविवाहांवर करडी नजर ठेवुन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हर्षा देशमुख यांचे नेतृत्वातील पथक सक्रिय आहे.

महादेव डोंगरे (जिल्हा बाल संरक्षण अधिकारी), कल्पना मोहीते (संरक्षण अधिकारी), सुप्रिया इंगळे (कायदा व परिविक्षा अधिकरी), दीपक बजारे (सामाजिक कार्यकर्ता), सोनु राहिंज (समुपदेशिका), सुनिल गायकवाड (सामाजिक कार्यकर्ता), कैलास पंडित (क्षेत्रीय कार्यकर्ता) व ग्रामसेवक, विशेष पोलीसांचे सहकार्य, ग्राम बाल संरक्षण समिती, वार्ड बाल संरक्षण समिती यांचे माध्यमातुन बालविवाह विषयक कायदेशिर कार्यवारी करण्यात येत आहे.

याप्रकरणी बालकांच्या पुढील पुनर्वसनाच्या दृष्टीने ज्योती पत्की (अध्यक्ष बाल कल्याण समिती) व सदस्य मनोहर बन्सवाल, शिऊरकर, मेघना चपळगावकर, सर्व सदस्य बाल कल्याण समिती यांची भूमिका महत्वाची ठरत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com