Monday, April 29, 2024
HomeUncategorized500 च्या नकली नोटा ; दोघं आरोपींना पोलीस कोठडी

500 च्या नकली नोटा ; दोघं आरोपींना पोलीस कोठडी

मलकापूर – प्रतिनिधी Malkapur

एचडीएफसी बँकेत (HDFC Bank) पैशाचा भरणा करण्यास गेलेल्या इसमाने आणलेल्या नोटांमध्ये ५०० च्या ३८ नोटा ह्या नकली निघाल्याने बँक कॅशियरने दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर शहर (police) पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल (Crime filed) केले असल्याची माहिती शहर पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत (Police Inspector Vijay Singh Rajput) यांनी दिली.

- Advertisement -

शहरातील एचडीएफसी बँकेत २१ फेब्रुवारी रोजी इरफान हनीफभाई पटनी मुळ रा.सुमरा सोसायटी रामनगर, गोदल राजकोट गुजरात (Gujarat) सध्या राहणार वडनेर भोलजी हा पैशाचा भरणा करण्यासाठी आला होता. त्याने २०००, ५००, २०० व १०० रूपयांच्य नोटा भरण्यास बँकेचे कॅशियर वैभव रमेश देशमुख यांच्याकडे बोहरा इंडस्ट्रीयल ऑईलचे (Bohra Industrial Oil) अकाऊंटवर भरणा करण्यासाठी पैसे व स्लिप दिली असता त्यांनी त्या नोटा मशिनमध्ये टाकल्या असता ५०० च्या नोटांमधील ३८ नोटा १९ हजार रूपये ह्या रिजेक्ट बॉक्समध्ये गेल्या. त्यानंतर त्यांनी पाहणी केली असता त्या नोटांची पेपर क्वॉलिटी खराब, हलक्या दर्जाची व नोटांमधील आरबीआयचा सिम्बॉल तार दिसून आला नाही. त्यानंतर कॅशीयर वैभव देशमुख यांनी सदर नोटा नकली असल्याबाबत इरफान पटनी यास सांगून त्या कोठून आणल्या असे विचारले. तेव्हा माझा पार्टनर शेख वसीम शेख सलीम आम्ही सोबत काम करतो, असे सांगिते.

बँकेत नकली नोटा भरण्यास आणल्या प्रकरणी एचडीएफसी बँकेचे कॅशीयर वैभव रमेश देशमुख (वय ३०) यांनी मलकापूर शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी १९ हजार रूपयांच्या नकली नोटा जवळ बाळगून एचडीएफसी बँक मलकापूर शाखेत भरणा केल्यामुळे त्यांचे विरूध्द कलम अप.नं.९०/२०२२ कलम ४८९ (ब), (क) भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला असून गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

आज दोघं आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने दि.28 फेब्रुवारी पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, याप्रकरणी अधिक तपास सपोनि स्मिता म्हसाये करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या