Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedचालकांअभावी ५० स्मार्ट सिटी बसेस जागेवरच!

चालकांअभावी ५० स्मार्ट सिटी बसेस जागेवरच!

औरंगाबाद – aurangabad

स्मार्ट सिटीअंतर्गत (smart city) खरेदी करण्यात आलेल्या शंभर टक्के बस रस्त्यावर उतरविण्यासाठी वाहक-चालक पुरविणारी एजन्सी नियुक्त करण्यात आली आहे. पण या एजन्सीकडून पुरेशा प्रमाणात कर्मचारी दिले जात नसल्याने अद्याप ५० टक्के बस जागेवरच उभ्या आहेत. त्यामुळे शहरवासीयांना नाईलाजाने खासगी प्रवासी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.

- Advertisement -

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत चार वर्षांपूर्वी शहर बस सुरू करण्यासाठी शंभर बस खरेदी करण्यात आल्या आहेत. या बस चालविण्यासाठी एसटी महामंडळासोबत करार करण्यात आला होता. महामंडळाने दोन वर्ष आवश्यक मनुष्यबळ पुरविले. पण कोरोना काळात व एसटी महामंडळाच्या संपानंतत शहर बस सेवा ठप्प झाली. महामंडळाचा संप मिटत नसल्याने स्मार्ट सिटी प्रशासनाने एसटीसोबतचा करार रद्द करून खासगी एजन्सीकडून वाहक, चालक घेऊन बस सेवा चालविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सहा महिन्यांपूर्वी निविदा प्रक्रिया राबवून मनुष्यबळ पुरवठा एजन्सीची नियुक्ती करण्यात आली. पण एजन्सीकडून अद्याप पुरेशा संख्येने मनुष्यबळ देण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रशासन अडचणीत आले असून, केवळ ५० शहर बसच रस्त्यावर धावत आहेत. स्मार्ट सिटी प्रशासनाने एजन्सीधारकाला नोटीस बजावली होती पण त्यानंतरही कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांचा पुरवठा केलेला नाही.

खासगी एजन्सीकडून बसेसमध्यील १०० पैकी ५० गाड्या कंडक्टर, ड्रायव्ह घेऊन बस जागेवरच उभ्या आहेत. तर दुसरीकडे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला. यामुळे नागरिकांचीही गैरसोय होत त्यासाठी सहा महिन्यांपूर्वी निविदा आहे. प्रक्रिया राबवून मनुष्यबळ पुरवठा चार वर्षांपूर्वी औरंगाबादच्या एजन्सीची नियुक्ती केली. जालना स्मार्ट सिटीतून प्रशासनाने १०० येथील श्रीसाई एजन्सीला हे काम बसेस खरेदी करत सिटी बस सेवा देण्यात आले आहे. आतापर्यंत सुरू केली. या बस चालवण्यासाठी सिटी बसच्या केवळ ५० गाड्याच एसटी महामंडळासोबत करार देखील रस्त्यावर धावत आहेत. अजूनही करण्यात आला. त्यामुळे पहिली खासगी एजन्सीकडून पुरेसे वाहक दोन वर्षे ही सेवा पूर्ण क्षमतेने सुरू आणि चालक मिळालेले नाहीत. मात्र नंतर कोरोना काळात त्यामुळे पन्नास बसेस जागेवर उभ्या निर्बंधांमुळे ती काही महिने बंद असल्याचे सूत्रांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या