Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादेत महापालिकेच्या स्टोअरमधून ४८ रेमडेसिवीर गायब

औरंगाबादेत महापालिकेच्या स्टोअरमधून ४८ रेमडेसिवीर गायब

औरंगाबाद : Aurangabad

देशात रेमडेसिविरची पळवापळवी सुरू आहे. असाच धक्कादायक प्रकार औरंगाबाादेत देखील घडला आहे. महापालिकेच्या मेडीकल स्टोअर रुममधून ४८ रेमडेसिवीर इंजक्शन गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि.28) रात्री उजेडात आला आहे. या प्रकरणी आयुक्तांनी तातडीने चौकशी करण्याचे आदेश देत पाच जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

- Advertisement -

महापालिकेने कोरोना रुग्णाच्या उपचारासाठी सरकारच्या कोट्यातून दहा हजार रेमडेसिवीर खरेदी केले होते. यातील काही रेमडेसिवीर घाटी व जिल्हा रुग्णालयास देण्यात आले. तर चिकलठाणा परिसरातील जिल्हा सामान्य रूग्णालय अर्थातच मिनी घाटीला देखील यातून काही इंजेक्शन दिले होते. येथे देखील काही दिवसांपूर्वी पाच इंजेक्शन चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली होती.

या पाठोपाठ आता मनपाच्या मेल्टाँन कोविड सेंटरमध्ये देखील इंजेक्शन चोरीला गेल्याचा प्रकार उजेडात आला आहे. मनपाने साडेचार हजार इंजक्शन मेल्टाँन कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी वापरले. उर्वरीत रेमडेसिवीर इंजक्शन मनपाच्या स्टोअर रुममध्ये ठेवण्यात आले.त्याची नोंदही घेतली.

परंतु स्टोअर रूममधून ४८ रेमडेसिवीर इंजक्शानचा बाँक्स गायब झाल्याचे निदर्शनास आले. मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. याप्रकरणी स्टोअरमधील पाच जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून २४ तासात खूलासा मिळाला नाहीतर गुन्हा दाखल करणार असल्याचे आयुक्त पाण्डेय यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या