Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedरेल्वेच्या कचाट्यात सापडून ४६ जनावरे ठार

रेल्वेच्या कचाट्यात सापडून ४६ जनावरे ठार

 औरंगाबाद Aurangabad

करमाडजवळील सटाणा शिवारात (Satan Shivarat) पाझर तलावावर (Pazar Lake) पाणी पिऊन (drinking water) पुन्हा चरण्यासाठी (while going) जात असताना ४३ मेंढ्या, एक गाय व दोन वासरे अशी ४६ जनावरे (animals) रेल्वे पटरी (Railway tracks) ओलांडताना (While crossing) चेन्नई एक्स्प्रेखाली (under Chennai Exp) चिरडली (crushed) गेली. ८ मे २०२० रोजी ज्याठिकाणी मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) १६ कामगार (workers) मालगाडीखाली (under the freight train) चिरडले (crushed) गेले होते. त्याच ठिकाणी हा अपघात सोमवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास घडला. या अपघातामुळे (accident)पोलीस आपणास पकडून नेतील, गुन्हा दाखल होईल, या भीतीने मेंढपाळ उरलेल्या मेंढ्यांसह बाजूच्या डोंगराच्या पायथ्याखाली पळून गेले. करमाड पोलिसांनी त्यांना धीर देत दोन मेंढपाळांना घटनास्थळी आणले.

- Advertisement -

बानगाव टाकळी, ता. नांदगाव, जि. नाशिक येथील सीताराम रामा गोवेकर, कौतिक चिंतामण गोवेकर, अंकुश चिंतामण गोवेकर आणि समाधान काशिनाथ मोरे हे तीन कुटुंब औरंगाबाद तालुक्यातील करमाड परिसरात अंदाजे तीनशे मेंढ्या घेऊन वास्तव्यास होते. त्यांच्यासोबत चार महिला, तीन मुली, मुलगा असा १२ जणांचा गोतावळा होता. दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास ते करमाड शिवारातून मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी रेल्वे पटरी ओलांडून सटाणा शिवारात असलेल्या पाझर तलावावर गेले. पाणी पाजल्यानंतर मेंढ्या पुन्हा उत्तरेकडून रेल्वे पटरी ओलांडून सटाणा शिवारात येत होत्या. त्यावेळी औरंगाबादहून जालनाकडे जाणारी चेन्नई एक्स्प्रेस येत होती. एका कळपाने रेल्वे पटरी ओलांडताना येणारी रेल्वे मेंढपाळांनी पाहिली. तेव्हा त्यांनी दुसरा कळप अडवण्याचा प्रयत्न केला.

रेल्वे ट्रॅकमन प्रभुदास शेजुळ व शेतकरी अशोक वाघ या दोघांनी रेल्वे येत असल्याची कल्पना मेंढपाळांना दिली. मेंढ्यांचा एक कळप पुढे गेल्याने अनेक प्रयत्न करूनही मेंढ्या थांबता थांबेना. त्यामुळे दुसऱ्या कळपातील ४३ मेंढ्या, गाय व दोन वासरे अशी ४६ जनावरे चिरडल्या गेली. अपघात होताच आपल्यावरच पोलीस कारवाई करतील भीतीपोटी हे मेंढपाळ बाजूच्या शेतात असलेले आपले बिऱ्हाड घेऊन इतरत्र पळू लागले. या मेंढपाळांनी उरलेल्या अडीचशे मेंढ्यांसह डोंगराच्या पायथ्याशी तुळशीराम जगधने यांच्या शेतात आसरा घेतला. सटाण्याचे पोलीस पाटील रफीक शहा यांनी करमाड पोलिसांना घटनेची माहिती कळविली.

- Advertisment -

ताज्या बातम्या