Saturday, April 27, 2024
HomeUncategorized४३७ ज्येष्ठांनी घेतला माेफत बससेवेचा लाभ

४३७ ज्येष्ठांनी घेतला माेफत बससेवेचा लाभ

औरंगाबाद – aurangabad

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis government) जनहिताच्या दृष्टीने ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना (Senior citizens) मोफत एसटी बससेवा (Free ST bus service) देण्यास सुरुवात केली आहे. या योजनेची अंमलबजावणी औरंगाबाद विभागात सुरू झाली असून पहिल्याच दिवशी ४३७ जणांनी या योजनेचा लाभ घेतला.

- Advertisement -

राज्य शासनाने पूर्वी ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा तिकीट योजना सुरू केली होती. त्याचा औरंगाबाद विभागातून पाच ते सहा लाख ज्येष्ठ नागरिक लाभ घेत आहेत. जुलैमध्ये पाच लाख ३ हजारपेक्षा जास्त ज्येष्ठांनी प्रवास केला. पहिल्याच दिवशी सिडको आगारातून २१, मध्यवर्ती बसस्थानक ६७, पैठण ८९, सिल्लोड ५९, वैजापूर ३८, कन्नड ७६, गंगापूर ८६, सोयगाव १ अशा ४३७ प्रवाशांनी लाभ घेतल्याची माहिती विभागप्रमुख सचिन क्षीरसागर यांनी दिली.

तिकिटावर येते शून्य रक्कम

ज्येष्ठ नागरिकांना प्रवासाच्या ठिकाणचे तिकीटही दिले जाते. सध्या ६५ वर्षे पूर्ण केलेल्यांना अर्धे तिकीट दर आकारण्यात येते. ७५ वर्षांवरील ज्येष्ठांच्या तिकिटावर शून्य रुपये असा उल्लेख असतो. एसटी महामंडळाने इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीनमध्ये अपडेटेशन केले. त्याअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्सचे क्रमांक टाकून वाहकाने ७५ नंबरचे बटण दाबल्यानंतर त्यांना शून्य असा उल्लेख असलेले तिकीट मिळते. दरम्यान, एसटी स्मार्ट कार्डसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या