Sunday, April 28, 2024
HomeUncategorizedमराठवाड्यात ४२ कोटींची वीज चोरी उघड

मराठवाड्यात ४२ कोटींची वीज चोरी उघड

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

मराठवाड्यात (Marathwada) गेल्या वर्षभरात ४१ कोटी ८२ लाख रुपयांची वीज चोरी उघड करण्यात आली आहे. ‘महावितरण’च्या या कारवाईअंतर्गत ३० कोटी ८८ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. ‘दक्षता व सुरक्षा अंमलबजावणी विभागा’ने वीज चोरांविरुद्ध ही धडक मोहीम राबविली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक वीज चोरी छत्रपती संभाजीनगरात उघड झाली असून त्याच्या खालोखाल लातूर जिल्हा क्रमांक दोनवर राहिला आहे. 

- Advertisement -

गेल्या वर्षभरात राबविली मोहीम महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाच्या आठ जिल्ह्यांत एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या आर्थिक वर्षात वीज चोरांच्या विरोधात मोहीम राबविण्यात आली. एकूण पाच हजार ७८५ वीज मीटरची तपासणी करण्यात आली. यामध्ये दोन हजार ९५३ मीटरमध्ये वीज चोरी उघडकीस आली आहे. सहा कोटी सहा लाख १४ हजार ३२९ युनिट वीज चोरी प्रकरणी ४१ कोटी ८१ लाख ९८ हजर स्पयांच्या अनुमानित वीज बिल दंडाच्या रकमेची आकारणी करण्यात आली. त्यातील ३० कोटी ८८ लाख रुपये दंड वसल करण्यात आला असून १९ ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

विद्युत कायदा २००३ नुसार कलम १२६ अंतर्गत शेजाऱ्यांकडून अनधिकृत वीज घेणे, मंजूर भारापेक्षा अधिक क्षमतेच्या भाराचा वापर करणे, मंजूर वर्गवारीतून दुसऱ्या वर्गवारीसाठी अनधिकृत विजेचा वापर करणे याचा समावेश होतो. कलम १३५ मध्ये मीटरची छेडछाड करणे, आकडा टाकून विजेचा वापर करणे, सर्व्हिस वायर टॅप करणे व १३८ मध्ये महावितरणचे मीटर, वायरसह इतर वस्तू चोरी करणे आदीचा समावेश आहे.

अशी झाली वीज चोरी 

छत्रपती संभाजीनगर शहर-११७४.६२ लाख, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण-३७९.९७ लाख, जालना-४०२.५० लाख, धाराशिव-५४०.६८ लाख, लातूर-५९७.०५ लाख, नांदेड-३१९.९४ लाख, परभणी ५३२.३३ लाख तर हिंगोली- १७१.०२ लाख रुपयांची वीज चोरी उघड झाली आहे. 

- Advertisment -

ताज्या बातम्या