४० लाखांचे सोने कारागिराने केले गायब 

'लॉकडाऊन'च्या भरपाईसाठी लढवली शक्कल 
४० लाखांचे सोने कारागिराने केले गायब 

औरंगाबाद - Aurangabad

शहरातील प्रसिद्ध ज्वेलर्सने दागिने तयार करण्यासाठी कारागिराकडे सोने दिले असता त्याने दिलेल्या सोन्यापेक्षा तब्बल 40 लाख रुपये किमतीचे 845 ग्रॅम कमी सोने देऊन व्यापाऱ्याला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदय हरीदास सोनी (रा. समर्थ नगर ) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. जालना रोडवरील लालचंद मंगलदास सोनी या ज्वेलर्सच्या दुकानातून अमरचंद प्रेमराज सोनी ( रा. पानदरिबा ) याला 1 जून ते 4 जून या काळात 3.279 किलोग्रॅम सोने दागिने तयार करण्यासाठी देण्यात आले होते.

अमरचंद सोनी याने दिलेल्या सोन्यापैकी 2.433 किलोग्रम सोन्याचे दागिने तयार करून दिले. मात्र, तब्बल 845 ग्रॅम सोने त्याने परत दिले नाही. त्याची किंमत 40 लाख इतकी असून ही बाब लक्षात येताच उदय सोनी यांनी तक्रार केली.

कारागिराला दिलेल्या सोन्यापेक्षा कमी दागिने आल्याबाबत विचारणा करण्यासाठी उदय सोनी हे अमरचंद सोनी याच्याकडे गेले असता, अमरचंद याने लॉकडाऊन काळात माझ्यावर प्रचंड उधारी झाली होती. लोकांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे दागिने तयार करण्यासाठी दिलेल्या सोन्यातून तयार केलेले दागिने परस्पर विकल्याची कबुली त्याने दिली. याबाबत उदय सोनी यांच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अमरचंद याला अटक करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com