जी-२० परिषदेसाठी ३५ इव्ही बसेसची ऑर्डर

स्मार्ट सिटी व्यवस्थापन सज्ज
जी-२० परिषदेसाठी ३५ इव्ही बसेसची ऑर्डर

औरंगाबाद Aurangabad

शहरासह जिल्ह्यातील जागतिक पर्यटनस्थळांना भेटी (Visits tourist places) देण्यासाठी जी-२० परिषदेला (G-20 summit) विविध देशांतील शिष्टमंडळातील (different countries) प्रतिनिधी (Representative in delegation)येणार आहेत. या प्रतिनिधींना फिरण्यासाठी स्मार्ट सिटीकडून (Smart City) इ-बसेसची व्यवस्था (Arrangement of e-buses) केली जाणार असून त्याकरिता इ-बस पुरविणाऱ्या इव्ही ट्रान्स प्रा. लि. कंपनीला (EV Trans Pvt. Ltd.company) दहा इ- बस पुरविण्याची सूचना केली असल्याचे मनपा प्रशासक तथा आयुक्त (Municipal Administrator and Commissioner) डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.

शहरात १३ व १४ फेब्रुबारी २०२३ रोजी जी-२० परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जी-२० परिषदेसाठी जय्यत तयारी केली जात आहे. जी-२० ही जागतिक परिषद असल्यामुळे या परिषदेसाठी विविध देशांतील शिष्टमंडळातील प्रतिनिधी येणार आहे. हे प्रतिनिधी विविध पर्यटन स्थळांना भेटी देणार असल्यामुळे प्रशासनाने प्रत्येक विभागावर जबाबदारी सोपवली आहे. स्मार्ट सिटीमार्फत इ-बसची व्यवस्था केली जाणार आहे.

जी-२० परिषदेसाठी ३५ इव्ही बसेसची ऑर्डर
औरंगाबादमधील रिक्षा चालकांना लागणार शिस्त!

या संदर्भात मनपा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले की,  जी-२० परिषदेसाठी येणार्‍या विविध देशांतील शिष्टमंडळांच्या प्रतिनिधींना पर्यटनस्थळी घेऊन जाण्यासाठी स्मार्ट सिटीकडून इ-बसची व्यवस्था केली जाणार आहे. स्मार्ट सिटीने इव्ही ट्रान्स प्रा. लि. कंपनीला ३५ इ-बस पुरविण्याची ऑर्डर दिली आहे. या कंपनीला फास्ट टॅकवर दहा ई-बस पुरविण्याचे कळविण्यात आले आहे.

कंपनीकडून बँक गॅरंटी भरल्यावर तातडीने वर्क ऑर्डर देण्यात येईल. इव्ही ट्रान्स प्रा. लि. कंपनीमार्फत हेदराबाद, बंगळुरू या ठिकाणी इ-बस चालविल्या जात आहेत. त्यामुळे विविध देशांतील प्रतिनिधींना फिरण्यासाठी दहा इ-बस पुरविण्याची सूचना केली आहे. इव्ही ट्रान्स प्रा. लि. कंपनीकडून एप्रिल महिन्यात पंधरा आणि जून महिन्यात २० इ-बस देण्यात येणार असल्याचे प्रशासक डॉ. चौधरी यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com