मळणी यंत्रात पदर अडकून 32 वर्षीय विवाहितेचा मृत्यू

तुरीची पहिली पेंडी टाकताच अडकला पदर
मळणी यंत्रात पदर अडकून 32 वर्षीय विवाहितेचा मृत्यू

मलकापुर - Malkapur

ग्राम तळणी येथे शेतात तुर काढतांना मळणी यंत्रात पदर अडकल्याने 32 वर्षीय विवाहिता जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी बारा वाजेदरम्यान घडली.

ग्राम तळणी येथील सुनील ओंकार खराटे कुटुंबासह आपल्या शेतात तुर काढण्यासाठी सकाळी अकरा वाजता शेतात गेले मळणी यंत्र (थ्रेशर) सुरु करुन तुरीची पहिली पेंडी टाकताच पदर अडकल्याने सौ.भारती खराटे ह्या यंत्रात अडकल्याने पती सुनील,मुलगा प्रज्वल, मुलगी साक्षी यांनी आरडाओरड करताच उपस्थित ट्रॅक्टरचालक, मजुरांनी यंत्र बंद करून वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र यंत्रात अडकल्याने सौ.भारतीचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची वार्ता गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली, अपघाताची माहिती पोलीस पाटील गजानन नारखेडे यांनी बोराखेडी पो.स्टे.ला दिली पो.हे.काॅ प्रल्हाद वानखेडे,पो. कॉ.ज्ञानेश्वर धामोडे आदींनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करुन मृतदेह वविच्छेदनासाठी मलकापुर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविला उपजिल्हा रुग्णालयात तळणी चे दिलीप नाफडे, ॲड.राजेंद्र चोपडे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर, उपाध्यक्ष समाधान सुरवाडे यांनी मदतकार्य केले शवविच्छेदनानंतर शोकाकुल वातावरणात सायंकाळी अंत्यविधी उरकण्यात आला,या दुर्दैवी घटनेने परीसरात शोककळा पसरली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com