Friday, April 26, 2024
HomeUncategorizedऔरंगाबाद विभागात २७ साखर कारखाने सुरू

औरंगाबाद विभागात २७ साखर कारखाने सुरू

औरंगाबाद – aurangabad

औरंगाबाद विभागात ऊस गाळप हंगाम (Sugarcane crushing season) सुरू झाला आहे.  मागील वर्षी विभागात २५ साखर कारखाने सुरू होते. यंदा २७ साखर कारखाने (Sugar factory) गाळप करणार आहेत, अशी माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने दिली आहे. गतवर्षीच्या तुलनेत उसाचे क्षेत्र कमी असल्याने वेळेत गाळप होणे अपेक्षित आहे. औरंगाबाद विभागात २७ कारखाने सुरू राहणार असून पहिली उचल अडीच हजार रुपये देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी (farmer) संघटनेने केली आहे. ऊस उत्पादक शेतकरी पहिली उचल मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

- Advertisement -

पहिल्या टप्प्यात ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. औरंगाबाद प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या अंतर्गत धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांतील काही साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याला दिल्यानंतर पहिली उचल अडीच हजार रुपये मिळावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. सध्या ऊस दिलेल्या शेतकऱ्यांना पहिली उचल मिळण्याची प्रतीक्षा आहे. मागील वर्षी विभागात २५ साखर कारखाने सुरू होते. यंदा २७ साखर कारखाने गाळप करणार आहेत, अशी माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने दिली आहे. 

मागील वर्षी औरंगाबाद विभागात १३२.८३ मेट्रिक टन ऊस गाळप आणि १२९.२७ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले होते. उसाचे अतिरिक्त क्षेत्र असल्यामुळे मे महिन्यापर्यंत ऊस गाळप सुरू होते. यंदा तुलनेने उसाचे क्षेत्र कमी आहे. शेतकऱ्यांनी कारखान्याकडे नोंदणी केली आहे. त्या तुलनेत उसाचे दहा टक्के क्षेत्र घटल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, अतिरिक्त ऊसतोडीचे कारखान्यांनी पुरेसे नियोजन केले नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. यावर्षी नोंदणीनुसार ऊसतोड करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या