अतिवृष्टीमुळे औरंगाबाद जिल्ह्यात 245 कोटींचे नुकसान

अतिवृष्टीमुळे औरंगाबाद जिल्ह्यात 245 कोटींचे नुकसान

शेती पिकांचे मोठे नुकसान

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात 7 व 8 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा परिषद (Zilla Parishad) अंतर्गत मालमत्तांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेने केलेल्या पाहणीत हे नुकसान एकूण 245 कोटींच्या घरात गेले असल्याचे समोर आले आहे. मात्र राष्ट्रीय आपत्ती निवारण समितीच्या (National Disaster Management Committee) तत्वानुसार केवळ 8. 90 कोटींचीच नुकसान भरपाई विचारात घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे (Chief Executive Officer Nilesh Gatne) यांनी दिली.

मागील दोन दिवसात सर्वत्र मोठा पाऊस झाला. या पावसामुळे जिल्हा परिषदांच्या अनेक मालमत्ता नष्ट झाल्या तर अनेक मालमत्तांचे मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक पाहणीत समोर आले आहे. गुरुवारी सीईओ गटणे यांनी या नुकसानीची माहिती प्रसार माध्यमांना दिली. गटणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये पाणीपुरवठा, ग्रामपंचायत, बांधकाम, आरोग्य, सिंचन अशा विभागांचे मिळून 245 कोटींचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या मालमत्तांमध्ये पाणी पुरवठा विभागांतर्गत कन्नड तालुक्यातील ग्रामपंचायत साई गव्हाण, नागद, देभेगाव व करंजखेडा अंतर्गत 4 योजनांचे 17.50 लक्ष रुपयांचे नुकसान झाले. ग्रामपंचायत विभागांतर्गत 144 ग्रामपंचायत इमारतींचे 17. 28 कोटींचे तर इतर 98 इमारतींचे 11.76 कोटी असे एकूण 242 इमारतींचे 29.04 कोटींचे नुकसान झाले आहे. बांधकाम विभागालाही या पावसामुळे मोठी झळ बसली आहे.

विभागाच्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील जऊठ आणि ग्रामरस्ते यांचे 6655 किलोमीटरपैकी 643 किलोमीटर रस्ते खराब झाले. या रस्त्यांचे एकूण 211.47 कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, त्यापैकी तातडीने रस्ते दुरुस्तीसाठी 9. 64 कोटीं रुपये आवश्यक आहे. याखेरीज आरोग्य विभागालाही या पावसाचा सामना करावा लागला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या 6एकूण इमारतींना या पावसाने नुकसान केले असून, एकूण 12.5 लक्ष रकमेचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. सिंचन विभागांतर्गत जिल्ह्यातील एकूण 20 बंधारे नुकसान ग्रस्त झाले असून, नुकसानी ची प्राथमिक आकडेवारी 419 लक्ष असल्याचे सीईओ गटणे यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेने केलेल्या पाहणीत हे नुकसान एकूण 245 कोटींच्या घरात गेले आहे. मात्र राष्ट्रीय आपत्ती निवारण समितीच्या तत्वानुसार केवळ 8.90 कोटींचीच नुकसान भरपाई विचारात घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांनी यावेळी दिली. दोन दिवस झालेल्या या पावसामुळे ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्हा परिषदेकडून आवश्यक ती उपाययोजना सुरु करण्यात आली असल्याचे यावेळी सीईओ गटणे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com