Monday, April 29, 2024
HomeUncategorized१९ वर्षीय युवतीवर चार वर्षांपासून अत्याचार 

१९ वर्षीय युवतीवर चार वर्षांपासून अत्याचार 

औरंगाबाद- Aurangabad

लग्नाचे आमिष दाखवून १९ वर्षीय युवतीवर चार वर्षांपासून अत्याचार केल्याची खळबळजनक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात घडली. याप्रकरणात आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शार्दुलवाडी येथे १९ वर्षीय तरुणी व गावातील योगेश शिवराम पवार (वय २० वर्ष) हे चार वर्षांपूर्वी वेरूळ येथे शाळेत सोबत जात असत. तेव्हापासून आरोपी योगेश पवार हा, या ना त्या कारणांने पीडित तरुणीस त्याच्या बहिणीच्या घरी तसेच शेतात व इतर ठिकाणी बोलावून बळजबरीने अत्याचार करायचा. त्यानंतर तरुणीस कुणाला काही सांगितले तर समाजात बदनामी करून टाकीन, अशी धमकी द्यायचा. त्यामुळे तरुणीने घाबरून कुणालाही काही सांगितले नाही. आरोपी योगेशने मी तुझ्याशी लग्न करतो, असे म्हणून वारंवार शरीरसंबध प्रस्थापित केले. तरुणीने लग्न करण्याचे विचारले असता घरच्या विरोधात कोर्ट मॅरेज करू, असे म्हणत परत दोनदा बळजबरीने अत्याचार केला. सतत होणाऱ्या अत्याचाराबाबतची माहिती पीडितेने नातेवाईकांना दिली.

तरुणीने खुलताबाद पोलिस ठाण्यात येऊन योगेश शिवराम पवार याच्याविरोधात अत्याचाराची तक्रार दिली. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक सीताराम मेहत्रे हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या