Friday, April 26, 2024
HomeUncategorizedविमान प्रवाशांच्या संख्येत १८ पटीने वाढ

विमान प्रवाशांच्या संख्येत १८ पटीने वाढ

औरंगाबाद – Aurangabad

गेल्या वर्षी जून महिन्याच्या तुलनेत यंदाच्या जूनमध्ये औरंगाबादच्या हवाई वाहतूक (Air transport) सेवेने भरारी घेतली असून विमानांच्या फेऱ्या पाचपट तर प्रवाशांच्या संख्येत १८ पटीने वाढ झाली आहे. कोरोनाच्या (Corona) संकटाच्या काळात ही सुखावणारी बाब असली तरी जून २०१९ मधील सामान्य परिस्थितीच्या तुलनेत ही संख्या कमीच असून अजून बराच मोठा पल्ला गाठायचाय. अल्प प्रतिसाद आणि लॉकडाऊनच्या (Lockdown) शंकेने कंपन्या विमाने सुरू करण्यास तयार नाहीत. यामुळे परिस्थिती सामान्य होण्यात अजून बराच काळ लागेल, असे जाणकारांचे मत आहे.

- Advertisement -

गेल्या वर्षी लॉकडाऊन लागण्यापूर्वी म्हणजे २० मार्च २०२० पर्यंत औरंगाबादहून मुंबई, दिल्ली, हैदराबाद, उदयपूर, अहमदाबाद आणि बँगळुरू शहरासाठी दररोज १४ ते १६ विमाने उड्डान करायचे. एअर इंडिया, इंडिगो, ट्रू जेट आणि स्पाईस जेटची सेवा होती. लॉकडानच्या काळात स्पाईसजेटने सेवा बंद केली. आता केवळ एअर इंडिया आणि इंडिगोचे दिल्ली, मुंबई आणि हैदराबादसाठी दररोज २ ते ४ विमाने सुरू आहेत. ७ आणि ९ जुलै तर इंडिगोचे फक्त एक विमान शहरात आले होते.

उत्साह वाढविणारा जून

गेल्या वर्षी आणि यंदाच्या जूनची तुलना केल्यास विमानांच्या फेऱ्या, प्रवासी आणि मालवाहतूकीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. मात्र, जुन २०१९ च्या तुलनेत अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जूनमध्ये विमानांच्या फेऱ्या पाचपट वाढल्या तर प्रवासी संख्येत १८ पट वाढ झाली. तरी २०१९ च्या तुलनेत ती दुपटीहून कमी आहे.

जून २१ जून २० जून १९

विमाने ९२ १६ १७६

प्रवासी ८६०६ ४७८ १७,३१४

मालवाहतूक ३९ ३ ४७

तिमाहीत वाढ

आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून २०२० मध्ये विमानांच्या २६ फेऱ्या, ४८१ जणांचा प्रवास तर ४ मेट्रीक टन मालवाहतूक झाली होती. यंदा एप्रिल ते जून २०२१ दरम्यान विमानांच्या ४३८ फेऱ्या, प्रवासी २३,७६५ तर मालवाहतूक १५० टनावर पोहचली. २०१९ च्या तुलनेत यात अजूनही मोठी तफावत आहे. २०१९ मध्ये ५५९ विमान फेऱ्या, ५३,३५१ प्रवासी आणि २११ टन मालाची वाहतूक झाली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या