धक्कादायक...औरंगाबादेत म्युकरमायकॉसिसचे 16 बळी!

201 रुग्ण उपचारासाठी दाखल
धक्कादायक...औरंगाबादेत म्युकरमायकॉसिसचे 16 बळी!

औरंगाबाद - Aurangabad

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता औरंगाबाद शहरावर म्युकरमायकॉसिस या आजाराचे संकट ओढावले आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांत हा आजार दिसून येत आहे. 1 एप्रिलपासून ते 15 मेपर्यंत या दीड महिन्याच्या काळात या आजाराचे 201 रुग्ण शहरातील विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल झाले आहेत. यातील धक्कादायक बाब म्हणजे दाखल रुग्णांपैकी 16 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत गंभीर रुग्णांचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. गंभीर रुणांवर उपचार करताना रेमडेसिवीरसह विविध प्रकारची हायडोसची औषधी वापरली जाते. त्यामुळे उपचाराअंती बरे झालेल्या काही कोरोनामुक्त व्यक्तींमध्ये पुढील काही दिवसांतच बुररशीजन्य अर्थातच म्युकरमायकॉसिस हा आजार दिसून येत आहे. त्यामुळे म्युकरमायकॉसिसच्या आजाराने कोरोनाच्या आजारा इतकीच किंबहुना त्यापेक्षा अधिक चिंता निर्माण केली आहे. सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बाब म्हणजे या आजाराचा उपचार अधिक खर्चीक आहे. तर शासनाच्या माध्यमातून या आजारावरील उपचारासाठी अत्यल्प पॅकेज दिले जात आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्यासमोर आजाराबरोबरच आर्थिक प्रश्न देखील निर्माण झाले आहेत.

पोस्ट कोविड अर्थातच कोरोनामुक्त व्यक्कतींत हा आजार आढळत असल्याने पालिकेने शहरातील खासगी रुग्णालयांकडून कडून म्युकरमायकॉसिस आजाराच्या रुग्णांबद्दल माहिती मागवली होती. त्या त्या दवाखान्यात दाखल असलेल्या म्युकरमायकोसिस रुग्णांची माहिती एक्सल शिटमध्ये द्या, असे पालिकेच्या आरोग्य विभागाने कळविले होते. त्यानुसार या विभागाकडे शहरातील सहा रुग्णालयांनी माहिती पाठवली. या माहितीवरुन 1 एप्रिल ते 15 मार्च दरम्यान म्युकरमायकॉसिस आजाराचे 201 रुग्ण बाधित दाखल झाल्याचे समोर आले आहे. यापैकी काही रुग्ण दहा मार्चपासून देखील हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आहेत. तर सोळा जणांचा या दिड महिन्यात मृत्यू झाल्याचेही यातून समोर आल्याने पालिकेची चिंता वाढली आहे.

खासगी रुग्णालयांकडून पालिकेला प्राप्त झालेल्या माहितीनुसार एमजीएम हॉस्पिटलमध्ये 76, एशियन हॉस्पिटलमध्ये 24, कमलनयन बजाजमध्ये 5, धुत हॉस्पिटलमध्ये 3, अपेक्स हॉस्पिटलमध्ये 43 तर घाटी रुग्णालयात 50 रुग्ण मागील दिड महिन्यात दाखल झाले आहेत. यापैकी मधुमेही रुग्णांची संख्या 76, ऑक्सीजनची कमतरता असलेल्या रुग्णांची संख्या 110, स्टॅरॉइटच्या रुग्णांची संख्या 148 आहे. एकाच रुग्णाला एकापेक्षा जास्त आजार असलेल्यांचाही यात समावेश आहे. पैकी सात जणांवर सध्या उपचार सुरू असून 180 रुग्ण आजवर उपचाराअंती बरे होऊन घरी परतले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com