छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar
ज्या कंपनीत काम करतो तिच्या नावासारखीच कंपनी स्थापन करून मूळ मालकाला तब्बल १५ लाखांचा गंडा घालणारी टोळी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी जेरबंद केली आहे.
तिघा भामट्यांनी मूळ कंपनीच्या नावाने सेम टू सेम वेबसाइट तयार केली आणि कंपनीचा डाटा चोरून त्या मूळ कंपनीच्या ग्राहकांना बेकायदा सॉफ्टवेअर विक्री करून १५ लाख रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी आशिष नंदकिशोर शहाणे, अन्सारी काशिफ सैफुल्लाह आणि अजय सुरेश सौदागर या तीन कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.
विक्रम लोकमित्र चुनारकर (क्य ३३, रा, कॉलनी, पडेगाव) यांनी मेडवर्ल्ड सोल्युशन प्रा. लिमिटेड हो कंपनी तयार केली. पदमपुरा येथील कंपनीच्या शाखेत दहा कर्मचारी कार्यरत आहेत. ही कंपनी इंश्युरन्स कंपनी आणि हॉस्पिटल याच्यासाठी कॅशलेस सेवेसह विमासंबंधी कामांसाठी सॉफ्टवेअर तयार करते. या कंपनीने स्वतःची वेबसाइट तयार केली. कंपनीत काम करणाऱ्या प्रशांत त्रिभुवन यांनी कंपनीत काम करणारे काही कर्मचाऱ्यांनी मेडवर्ल्ड सोल्युशन डॉट इन या संकेतस्थळाप्रमाणे बीझ प्राइम सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड असे संकेतस्थळ तयार केले. याच कंपनीचे व्हिजिटिंग कार्ड तयार करून आशिष कुमार शहाणे, अन्सारी काशिफ आणि अजय सुरेश सौदागर या तिघांनी तीन ते चार ग्राहक मिळवून कंपनीचे नुकसान केले; तसेच संकेतस्थळ तयार करून आर्थिक नुकसान केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मेडवलर्ड सोल्युशन कंपनीत काम करणाऱ्या तिघांनी कंपनीत राहत स्वतःची कंपनी तयार केले असल्याची माहिती मिळाताच कंपनीच्या संचालकांनी त्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचे आदेश दिले. त्यांच्या जवळील बॅगची पाहणी केली असता त्यात बीझ प्राईम कंपनीचे स्टॅम्प, व्हिजिटिंग कार्ड, चेकबुक आणि एक पेन ड्राइव्ह आढळला. या पेन ड्राइव्हमध्ये मेडवर्ल्ड सोल्युशन कंपनीच्या ग्राहकांचा तपशील, सात वर्षांचा डाटा; तसेच कंपनीच्या मालकाचे बँक युजर नेम पासवर्ड अशीही माहिती समोर आली आहे.