औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहातील 14 कैदी कोरोना पॉझिटिव्ह

औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहातील 14 कैदी कोरोना पॉझिटिव्ह

औरंगाबाद Aurangabad

काही दिवसांपासून शहरात कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. पण रविवारी हर्सूल कारागृहातील Hersul Prison 14 कैद्यांचे Prisoner's कोरोना अहवाल corona report पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरात तिस-या लाटेचा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

शहरात काही दिवसांपासून दररोज केवळ चार ते पाच रुग्ण आढळून येत होते, पण रविवारी कोरोनाचे 23 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी हर्सुल तुरुंगातील 14 कैदी पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती समोर आली आहे.

शहरात कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली आहे. मात्र तिसरी लाट येण्याचा धोका असल्याचे प्रशासनाने यापूर्वीच जाहीर केले आहे. तरी दखील नागरिकांकडून दुर्लक्ष होत आहे. मनपाने कोरोना चाचण्यांची संख्या वाढविल्या असून दररोज सुमारे अडीच हजार चाचण्या होत आहे.

महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या की, हर्सुल तुरुंगातील 14 कैदी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मात्र त्यांच्यात कोणतेही लक्षणे आढळून आलेली नाहीत. जेलमधील एक हजार कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

या 14 कैद्याना स्वतंत्र ठेवण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्याकरिता नागरिकांनी काळजी घ्यावी. गर्दी टाळावी, मास्कचा वापर करावा, सॅनीटायझरचा वापर करावा, सुरक्षीत अंतर ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com