औरंगाबादवरही विजेचे 'संकट'

काटकसरीने वीज वापराचे आवाहन
औरंगाबादवरही विजेचे 'संकट'

औरंगाबाद - aurangabad

कोळसा टंचाईमुळे महावितरणला (MSEDCL) वीज पुरवठा करणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील (Power Station) १३ संच बंद असल्याने ३३३० मेगावॅट वीज पुरवठा ठप्प आहे. विजेची तूट भरून काढण्यासाठी वीज खरेदीसह अन्य स्रोतांकडून वीज पुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात वीज तुटवडा टाळण्यासाठी ग्राहकांनी विजेचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

देशभर कोळसा टंचाई निर्माण झाल्यामुळे औष्णिक वीजनिर्मिती घटली आहे. महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील १३ संच कोळशाअभावी बंद आहेत. 'महानिर्मिती'चे चंद्रपूर, भुसावळ व नाशिक प्रत्येकी २१० मेगावॅटचे तसेच पारस- २५० मेगावॅट आणि भुसावळ व चंद्रपूर येथील ५०० मेगावॅटचा प्रत्येकी एक संच बंद आहे. कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे (गुजरात) ६४० मेगावॅटचे चार संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे (अमरावती) ८१० मेगावॅटचे तीन संच बंद आहेत. महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमधून मिळणाऱ्या विजेत घट झाली आहे.

'विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार कृषी वाहिन्यांवर दररोज आठ तास दिवसा किंवा रात्री चक्राकार पद्धतीने थ्री-फेज वीजपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातही विजेचा तुटवडा वाढण्याची शक्यता असल्याने वीज ग्राहकांनी सकाळी ६ ते १० आणि सायंकाळी ६ ते रात्री १० दरम्यान विजेचा वापर काटकसरीने करावा,' असे आवाहन महावितरणने केले आहे.

Related Stories

No stories found.