Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedबारावीचा आज ऑनलाईन निकाल

बारावीचा आज ऑनलाईन निकाल

पुणे|प्रतिनिधी|Pune

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी- मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी चा ऑनलाईन निकाल आज (गुरुवार दि. 16 जुलै) रोजी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

- Advertisement -

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (12वी) पार पडली. परंतु, करोनाच्या संकटामुळे दहावी आणि बारावीचे निकाल लांबले आहेत.

ऑनलाईन निकालाबाबत लगेच दुसर्‍या दिवसापासून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (http://verification.mh-hsc.ac.in) स्वत: किंवा शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय या परीक्षेपासून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी-शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत.

गुणपडताळणीसाठी शुक्रवारी 17 जुलै ते सोमवार 27 जुलैपर्यंत व छायाप्रतीसाठी शुक्रवार 17 जुलै ते बुधवार 5 ऑगस्टपर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरता येईल

फेब्रुवारी-मार्च- 2020 परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांतच

पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित निभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

3) फेब्रुवारी-मार्च 2020 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

बारावीचा निकाल खालील वेबसाईटसवर पाहता येईल

www.mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.org

www.maharashtraeduction.com

- Advertisment -

ताज्या बातम्या