छत्रपती संभाजीनगर महापालिकेत १० कोटींचा अपहार

भ्रष्टाचारात सहा अधिकारी अडकले
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत १० कोटींचा अपहार

छत्रपती संभाजीनगर - Chhatrapati Sambhajinagar


शासन दरबारी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी जनतेला सेवासुविधा देण्याच्या कर्तव्यात कसूर करत स्वतःच्या लाभासाठी शासकीय योजनांचा सर्वच निधी गिळंकृत केला. हा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागातील (Department of Public Works) सहा अधिकारी व कर्मचार्‍यांच्या टोळीने केला. या टोळीने फुलंब्री आणि सिल्लोड तालुक्‍यातील ७३ स्स्त्यांच्या कामांची बिले बनाबट कागदपत्रांद्रारे परस्पर काढून घेतली, यात तब्बल १० कोटी ७ लाख रूपयांचा अपहार केल्याचे समोर आले आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेत १० कोटींचा अपहार
कलेच्या माध्यमातून क्रांतीसूर्यास नमन

चौकशीअंती याप्रकरणी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांच्या आदेशाने नायब तहसीलदार राजेंद्र शिंदे यांच्या तक्रारीवरून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या अपहाराप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता एम.एम. कोल्हे, शाखा अभियंता बी,बी. जायभाये, शाखा अभियंता आर. जी. दिवेकर, शाखा अभियंता ए. एफ. राजपूत, शाखा अभियंता नागदीवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अधिकाऱ्यांच्या टोळीने कुशल रोजगार हमी योजनेअंतर्गत २००९ ते २०१६ या कालावधीत सिल्लोड व फुलंब्री तालुक्‍यात झालेल्या रस्त्यांची कामे न करताच त्या कामांची बिले शासनाकडे सादर केली, या बनावट कागदपत्रांच्या आधारे १० कोटी ७ लाख रुपये परस्पर कोषागार विभागातून काढून घेतले. हा प्रकार संशयास्पद वाढल्यानंतर सिल्लोड व फुलंब्री तालुक्यातील कुशल रोजगार हमी योजनेतील कामात भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी तक्रार देण्यात आली होती, त्या तक्रारीवरून २०१३ ला कुशल कामाच्या चौकशीचे अभिलेख पडताळण्यात आले, यात सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचा भ्रष्ट कारभार स्पष्ट दिसून आले. प्रत्यक्षात ही कामे न करताच कामाचे कोणतेही कागदपत्र व अहवाल न देता योजनेशी संबंधित तत्कालीन शाखा अभियंता बी. बी. जायभाये, शाखा अभियंता आर्‌.जी, दिवेकर, शाखा अभियंता ए.एफ. राजपूत, शाखा अभियंता नागदिवे व उपविभागीय अभियंता एम.एम. कोल्हे सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी शासकीय रक्कम शासकीय कोषागार कार्यालयातून काढून परस्पर हडक केली. तसेच कट कारस्थान रचून बनावट देयके व कागदपत्रे बनवून सदर कागदपत्रांचा वापर करून शासनाचे पैसे काढून अपहार केल्याप्रकरणी या सर्व आरोपींविरुद्ध कलम ४२०, ४०६, ४६८, ४७१,१२० ब, ३४ प्रमाणे सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
फुलंब्री, सिल्लोडमध्ये दाखवली बनावट कामे
फुलंब्री तालुक्‍यात ४२ रस्त्यांची कामे करण्यात आली, यासाठी ५ कोटी ५० लाख ४६ हजार रुपये, तर सिल्लोड तालुक्‍यात ३१ रस्त्यांची कामे करण्यात आली, त्यासाठी ४ कोटी ५६ लाख ५४ हजार रुपयांचे असा खर्च करण्यात आला. या कामांची प्रत्यक्ष चौकशी करण्यात आली तेव्हा जिल्हा दक्षता समितीने संबंधित कामांचा अभिलेख मागितला. तो संबंधितांनी पुरवलाच नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com