#OSCARS : अमिताभ, प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय बच्चन, आमिरला ऑस्करचे आमंत्रण

0

बी- टाऊनच्या अमिताभ बच्चन, प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय बच्चन या प्रसिद्ध कलाकारांसोबतच निर्माते गौतम घोष, बुद्धसाहेब दासगुप्ता यांच्यासह जवळपास ७७४ व्यक्तींना अकॅडमीमध्ये जाऊन ऑस्करसाठी त्यांचं मत देण्याचं आमंत्रण दिलं आहे.

पण, या सर्व कलाकारांमध्ये शाहरुख खानचं नाव मात्र नाहीये.

शाहरुखची आजवरची चित्रपट कारकिर्द आणि त्याला मिळालेलं यश पाहता अनेकांनाच त्याचा हेवा वाटतो. पण, ऑस्करने मात्र बॉलिवूडच्या या किंगकडे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे.

अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्स वेबसाइने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी ५७ देशांमधील व्यक्तींना बोलवण्यात आलं आहे.

ज्यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, इरफान खान, वेशभूषाकार अर्जुन भसिन यांच्या नावाचा समावेश आहे

LEAVE A REPLY

*