OSCAR 2019 : ‘ग्रीन बुक’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

0
लॉसएंजेलिस:  चित्रपटसृष्टीत सर्वाधिक मानाचा समजला जाणारा ९१ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियामधल्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. यंदाचा ऑस्कर हा ‘ग्रीन बुक’ चित्रपटानं पटकावला आहे.  या चित्रपटाला ऑस्करमध्ये एकून पाच नामांकनं होती त्यातल्या तीन पुरस्कारांवर ‘ग्रीन बुक’नं आपली मोहर उमटवली आहे. ओरिजनल स्क्रीनप्ले, सर्वोत्तम चित्रपटाचा ऑस्कर ‘ग्रीन बुक’ नं पटकावला आहे. पीटर फेराली या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

पुरस्कार विजेत्यांची यादी
सर्वोत्कृष्ट चित्रपट- ग्रीन बुक
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अल्फॉन्सो क्वारॉन – रोमा
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – ऑलिव्हिया कोलमन – द फेव्हरिट
सर्वोत्कृष्ट अभिनेता – रमी मॅलेक – बोहेमिन ऱ्हॅप्सडी
सर्वोत्कृष्ट गाणं – शॅलो – अ स्टार इज बॉर्न
सर्वोत्कृष्ट (आधारित) पटकथा – ब्लॅकक्लॅन्समन
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – ब्लॅक पँथर
सर्वोत्कृष्ट (मूळ) पटकथा – ग्रीन बुक
सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन लघुपट – स्किन
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स – फर्स्ट मॅन
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट – पीरियड. एंड ऑफ सेन्टेन्स
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म – बाव
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर – स्पायडर मॅन-इन टू द स्पायडर व्हर्स
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – महेरशाला अली – ग्रीन बुक
सर्वोत्कृष्ट संकलन – बोहेमिन ऱ्हॅप्सडी
सर्वोत्कृष्ट चित्रपट (परदेशी भाषा विभाग) – रोमा
सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण – बोहेमिन ऱ्हॅप्सडी
सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन – बोहेमिन ऱ्हॅप्सडी
सर्वोत्कृष्ट छायांकन – अल्फॉन्सो क्वारॉन – रोमा
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन – हॅना बेकलर – ब्लॅक पँथर
सर्वोत्कृष्ट वेशभूषा – रुथ कार्टर – ब्लॅक पँथर
सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा – व्हाईस
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर – फ्री सोलो
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – रेजिना किंग – इफ बील स्ट्रीट कुड टॉक

LEAVE A REPLY

*