Type to search

क्रीडा नाशिक

उद्या शहरात फिरता चषक बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

Share

नाशिक : आशिया खंडातील सर्वात मोठे चेस नेटवर्क चेसविकी डॉट कॉम व भुषण चेस अकॅडमी यांच्यातर्फे नाशिक मध्ये प्रथमच रविवार ( दि. २८ ) फिरता चषक बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धेच्या प्रथम विजेत्याला महाचषक प्रदान करण्यात येईल.

हा महाचषक विजेत्याकडे पुढील स्पर्धा आयोजीत होई पर्यंत असेन. त्यानंतर संपूर्ण ५ स्पर्धेच्या शेवटी जो खेळाडू सर्वाधिक स्पर्धा जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजवेल त्याला हा महाचषक प्रदान करण्यात येईल. नाशिक मध्ये प्रथमच अशी स्पर्धा भरविण्यात येत आहे. या स्पर्धेत एकूण अकरा बक्षिसे ठेवण्यात आली आहे.

खुल्या गटात प्रथम क्रमांक रु. २००१/- रोख तसेच महाचषक व प्रमाणपत्र , दुसरा क्रमांक रु. १००१/- रोख व प्रमाणपत्र, तिसरा क्रमांक रु. ८०१/- रोख व प्रमाणपत्र, चौथा क्रमांक रु. ६०१/- रोख व प्रमाणपत्र, पाचवा क्रमांक रु. ५०१/- रोख व प्रमाणपत्र. तसेच ७ वर्षाखालील, १० वर्षाखालील, १५ वर्षाखालील गटात आकर्षक सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या व्यतिरिक्त उत्कृष्ट दिव्यांग खेळाडु, उत्कृष्ट महिला खेळाडु व उत्कृष्ट वयोवृद्ध खेळाडु यांना देखील आकर्षक सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

हि स्पर्धा इस्पालियर एक्सपेरिमेंटल स्कूल, त्रिमूर्ती चौक, नाशिक येथे आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी विनायक वाडिले (८८८८११९३३५) व भुषण पवार (७८४१९२४८४१) यांच्याकडे नावनोंदणी करायची. स्पर्धकांनी स्वता:चा चेसबोर्ड व क्लॉक आणावे. तसेच स्पर्धकांनी १०:३० वाजता उपस्थित राहावे असे आयोजकांनी आव्हान केले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!