नाशिक त्र्यंबकेश्वर सायक्लोथॉनचे आयोजन; करणार ब्रह्मगिरीची परिक्रमा

0

नाशिक : नाशिक सायकलीस्ट्स फाउंडेशनतर्फे आणि महानगरपालिकेचे माजी मुख्य अभियंता यु. बी. पवार यांच्या सहकार्याने नाशिक त्र्यंबकेश्वर सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले असून सुमारे 250 हुन अधिक सायकलिस्ट्स यात सहभागी होत ब्रह्मगिरीची परिक्रमा पूर्ण करणार आहेत. गेल्या सात वर्षांपासून आयोजित होणाऱ्या ब्रह्मगिरी परिक्रमेचे २० किमीसह ही एकूण ७५ किमीची सायक्लोथॉन सायकलीस्ट्स पार पाडणार आहेत.

रविवारी (दि. 2) रोजी सकाळी सकाळी ६ वाजता गोल्फ क्लब येथून सायक्लोथॉनला सुरुवात होणार असून उपमहापौर प्रथमेश गीते, नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय दराडे, नाशिक सायकलिस्ट्सचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.

श्रावणात अधिक प्रमाणात होणाऱ्या ब्रह्मपरिक्रमेच्या निमित्ताने या सायक्लोथॉनचे आयोजन होत असते. नाशिक ते त्र्यंबकेश्वर असे सायकलिंग केल्यानंतर २० किमीची पायी परिक्रमा करत सर्व सायकलिस्ट्स करणार आहेत. सायकलिंग आणि ट्रेकिंग यांचा सुंदर मिलाफ या सायक्लोथॉन द्वारे साधला जाणार असून ब्रह्मगिरीचे निसर्ग सौंदर्य अनुभवण्याची संधी सायकलीस्ट्सला उपलब्ध होणार आहे.

गोल्फ ग्राउंड-त्र्यंबक रोड-अंजनेरी-पेगलवाडी-पहिने-कोजोळी-गौतम ऋषी टेकडी-दुगारवाडी फाटा-त्र्यंबक- नाशिक असा या परिक्रमेचा मार्ग असणार आहे. ग्रेप काँटी रिसॉर्ट तर्फे लकी ड्रॉ विजेत्याला एक सायकल देण्यात येणार असून सायक्लोथॉनच्या मार्गावर ठिकठिकाणी पाणी उपलब्ध करण्यात येणार असून रुग्णवाहिका, बॅकअप व्हॅन पूर्ण प्रवासादरम्यान उपलब्ध राहणार आहे. यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसून सहभागी होण्यासाठी समन्वयकाशी संपर्क साधण्याचा आवाहन आयोजकांनी केले आहे. यु. बी. पवार, योगेश शिंदे, वैभव शेटे, डॉ. मनीषा रौदळ यांचे समन्वयाने ही मोहीम राबवली जाणार आहे.

LEAVE A REPLY

*