अवयवदान जागृतीसाठी ‘आएमए’चे स्पॅनिश मॉडल

0

नाशिक । मरोणोत्तर अवयवदान चळवळीला गती मिळावी, जनमानसात याबद्दलचे गैरसमज दूर व्हाव आणि गरजू रुग्णांना याचा फायदा व्हावा यासाठी इंडियन मेडिकल असोशिएन , नाशिक स्पेनच्या धर्तीवर स्पनिश प्रोटोकॉल कार्यक्रम राबवणार आहे. येत्या रविवारी (दि.13 ) जागतिक अवयव दान दिनाचे औचित्य साधून वर्षभर भरगच्च जागृती अभियान चळवळ राबवणार असल्याची माहिती आयएमए अध्यक्ष मंगेश थेटे आाणि डॉ. हेमंत सोेनानीस यांनी पत्रपरिषदेत दिली.

मेंदू मृत झालेल्या व्यक्तींचे अनेक अवयव गरजूंसाठी वरदान ठरतात. जगात स्पेन अवयवदान चळवळीत अग्रेसर असून त्यांनी राबवलेला स्पॅनिश प्रोटोकॉल नाशिक ‘आएमए’ राबवणार आहे. त्या अंतर्गत सर्व डॉक्टरांचे प्रशिक्षण, शासकीय यंत्रणाचा सहभाग व नियम निर्मिती तसेच जाणीव जागृती करणे, अवयव दानासंबंधी क्लिष्टता कमी करून पोलिसांंना यामध्ये सहभागी करून घेणे आणि सामान्य लोक तसेच प्र्रसार माध्यमांच्या माध्यमातून अवयवदान चळवळीला गती देणे असे नियोजन करणार असल्याची माहिती डॉ. सोनानीस यांनी दिली.

अवयवदान रॅली : येत्या रविवारी (दि.13) जागतिक अवयवदान दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ नाशिक आणि आयएमए यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठ ते आरोग्य विद्यापीठ अशा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सुनील देशपांडे यांच्या नेतृत्त्वात निघणार्‍या यात्रेत विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, श्री साईबाबा हाटर्र् इन्सिट्युट, अपोलो रुग्णालय सहभागी होणार आहे. सर्व स्वयंसेवी संस्था, इच्छुक नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

‘आएमए’ उभारणार ग्रंथालय : अवयवदानासंबधी माहिती व जागृती व्हावी यासाठी आएमए,नाशिक आपल्या जागेत लवकरच ग्रंथालय उभारणार आहे. याशिवाय नॅशनल ह्युमन ऑर्गन डोेनर्स रजिस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त लोकांंनी नावे नोंदणी करावी यासाठी शहरात पहिल्यांदाच ऑर्गन डोनेशन प्लेज फॉर्म क्र-7 व त्यासंबंधीची माहिती संकेतस्थळावरून सर्व डॉक्टर्सपर्यंत ती उपरोेक्त नॅशनल ह्युमन ऑर्गन डोेनर्स मध्ये सामिल करून घेतली जाणार आहे.

अवयवदानाचा टक्का वाढला : गेल्या वर्षी मेंदूमृत झालेल्या 104 व्यक्तींपैकी 56 जणांच्या नातेवाईकांनी अवयवदान केले होते. या वर्षी 68 मेंदूमृत व्यक्तीपैकी 34 रुग्णांच्या नातेवाईकांनी पूढकार घेऊन अवयवदान केले.

LEAVE A REPLY

*