Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

राज्यातील प्रत्येक डेपोतील काही एसटी कर्मचार्‍यांना मुंबईत हजर होण्याचे आदेश

Share

मुंबई – कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) राज्यभरातील प्रत्येक डेपो मधील काही एसटी कर्मचार्‍यांना मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे एसटी कर्मचारी नाराज आहेत या आदेशानंतर अनेक जिल्ह्यातील एसटी कर्मचार्‍यांनी हजर होण्यास नकार दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेसाठी एसटी कर्मचार्‍यांना मुंबईत बोलावले असल्याची माहिती आहे.
अत्यावश्यक सेवेसाठी बोलवलेले कर्मचारी जर हजर राहिले नाहीत तर काही डेपोतील कर्मचार्‍यांना निलंबित करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. या कर्मचार्‍यांना मुंबईतून परत आल्यानंतर 14 दिवस क्वॉरंटाईन होण्याची कर्मचार्‍यांना भीती आहे. तसेच कोरोनाच्या या स्थितीत आई-वडील तसेच घरचे लोक मुंबईला सोडण्यास तयार नसल्याची भावनिक साद देखील कर्मचार्‍यांनी घातली आहे.

तसेच अनेक कर्मचारी लॉकडाऊनमुळे गावांमध्ये अडकले आहेत. गावचे रस्ते बंद असल्याचे कारण देत काही कर्मचार्‍यांनी कामावर येण्यास नकार दिला आहे. या आदेशानंतर काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. मात्र हजर झालेल्या कर्मचार्‍यांच्या जेवणाचीही सोय होत नसल्याचा आरोप केला जात आहे.
शंभर टक्के वेतन 7 तारखेलाच – दुसरीकडे एसटीच्या चालक, वाहक, यांत्रिकी कार्यशाळा कर्मचारी, स्वछता कर्मचारी यांचे शंभर टक्के वेतन 7 तारखेलाच होणार असल्यानं एसटी कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळाला. एसटीच्या चालक, वाहक, यांत्रिकी कार्यशाळा कर्मचारी, स्वछता कर्मचारी यांचे शंभर टक्के वेतन सात तारखेलाच होणार आहे. तेही कुठलीही कपात न करता. मात्र एसटीच्या अधिकारी, लिपिक यांचे वेतन मात्र 50 ते 75 टक्केच होणार आहे.

वेतन अदा करताना एसटीच्या चालक, वाहक, यांत्रिकी कार्यशाळा कर्मचारी, स्वछता कर्मचारी यांची 100 टक्के हजेरी म्हणजे 31 दिवस उपस्थिती ग्राह्य धरून वेतन करण्यात येणार आहे. तर पर्यवेक्षकीय कर्मचारी व लिपिक व तत्सम वर्गासाठीच्या कर्मचार्‍यांसाठी 31 दिवसाच्या 75 टक्के म्हणजेच 24 दिवसांचे वेतन होणार आहे. तर वर्ग एक आणि वर्ग दोनच्या अधिकार्‍यांचे 50 टक्के म्हणजे हजेरीचे 16 दिवस वेतन करण्यात यावे, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. अधिकारी, लिपिक तसेच पर्यवेक्षकीय कर्मचारी यांचे वेतन दोन टप्प्यात होणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!