Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे होता होईनात

Share

अहमदनगर (वार्ताहर) – नगर तालुक्यातील खडकी, खंडाळा, बाबूर्डी बेंद, धोंडेवाडी, वाळकी, सारोळा कासार हा भाग जिल्ह्यातील प्रमुख संत्रा उत्पादकांचा भाग आहे. 8 ऑक्टोबरच्या रात्री या भागात वादळी पाऊस झाला. त्यात शेकडो हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचे नुकसान झाले, पण महिन्यानंतर अद्यापही प्रशासनाला या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी मुहूर्त मिळालेला नाही.

नगर तालुक्यात मागील वर्षी आजवरचा सर्वात मोठा दुष्काळ पडलेला होता. अशाही अवस्थेत खडकी, खंडाळा, बाबूर्डी बेंद या भागातील शेतकर्‍यांनी जिद्दीने आपल्या फळबागा जगवल्या.अहमदनगर आणि मिळेल त्या ठिकाणावरून टँकरने पाणी आणून फळबागांना घातले. त्यावर लाखो रुपयांचा खर्च केला. जूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने मृग बहार चांगला फुटला. झाडांना चांगली फळे लागली. दुष्काळात घातलेल्या पाण्याचे चीज होऊन चांगले पैसे मिळतील, अशी आशा शेकर्‍यांना होती.

पण ऑक्टोबर महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरू राहिली. त्याच काळात खडकी आणि परिसरात वादळी वार्‍यासह पाऊस झाला आणि मोठ्या प्रमाणात संत्रा फळबागांचे नुकसान झाले. कोट्यवधी रुपयांची फळे गळाली. एकट्या खडकीत 100 एकरांपेक्षा जास्त फळबागांना फटका बसला. पण तब्बल एक महिन्यानंतरही कृषी, महसूल अशा कोणत्याही विभागाचा एकही अधिकारी या शेतकर्‍यांकडे फिरकला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या डोळेझाक पणाबद्दल शेतरकर्‍यांमध्ये तीव्र रोष आहे.

नुकसानीची माहितीही कुणी घेईनात
टँकरच्या पाण्यावर फळबागा जगवल्या. त्यासाठी लाखो रुपये खर्च केला. 2012 च्या दुष्काळात फळबागा जगविण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस शासनाने शेतकर्‍यांना अनुदान दिले होते. पण आता अनुदान तर सोडा, झालेल्या नुकसानीची माहिती विचारायलाही कोणी आलेले नाही. अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.आमचेही नुकसान अतिवृष्टीमुळेच झालेले आहे. त्यामुळे तातडीने पंचनामे करावेत आणि आम्हाला मदत द्यावी.
– प्रकाश निकम, खडकी (संत्रा उत्पादक शेतकरी)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!