Type to search

Breaking News Featured ब्लॉग मुख्य बातम्या

Blog : करिअरच्या वाटेवर

Share

काही दिवसांपुर्वीच बारावीचा निकाल लागला. तर आठवडाभरात दहावीच्या परिक्षेचा निकाल लागेल. बोर्डाच्या परिक्षेच्या या तणावातून आम्ही मुक्त झालो. माझ्यासह माझे सहकारी चांगले गुण घेऊन उत्तिर्ण झालो. अनेकांना 90 टक्के गुणही कमी वाटले यामुळे ते नाराज झाले, काहींना कमी गुण मिळूनही ते आनंदी दिसलेे, तर काही सहकारी नापासही झाले.

परंतु नापास झाले किंवा कमी गुण मिळाले म्हणून काहींनी आत्महत्या केल्याच्या बातम्या वाचून मन हादरूनही गेले. मग असा प्रश्न पडतो की, आपल्या जीवापेक्षा, जीवलगांंपेक्षा बोर्डाच्या परिक्षेचा निकाल महत्वाचा आहे का? ही म्हणजे जीवनातील शेवटची परिक्षा आहे का? की यानंतर आपण जीवनात काहीच करू शकत नाही का? याचा विचार माझ्या प्रत्येक मित्र मैत्रिणींसह त्यांच्या पालकांनीही करावा असे कळवळून सांगावेसे वाटते.

आपल्या शिक्षण व्यवस्थेमुळे दहावी व बारावी प्रत्येकाच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट असतो, आणि करिअरची सुरुवात होते ती येथूनच असाच समज झाला आहे. दहावी तसेच बारावी पास झाल्यानंतर करिअर हा प्रश्न सगळ्यांसमोर आ वासून उभा राहतो. करिअर म्हणजे नक्की काय हो? करिअर म्हणजे फक्त पैसे कमावण का? ऐषोआरामात जीवन जगणं का? एकदा डोळे उघडे ठेवून पाहिले तर करिअरच्या असंख्य वाटा नजरेसमोर उभ्या राहतात. परंतु इंजिनिअरकडे अनेकांचा कल कारण यात लाखोंचे पॅकेजेस मिळतील. अनेकांना डॉक्टर व्हायचय,

बँकेत जास्त पगाराची नोकरी करायची, कलेक्टर, आयपीएस अधिकारी व्हायचंय अशी स्वप्न पहिली जातात. मग अशा स्वप्नांच्या बोजाचा पहिला फटका दहावी तसेच बारावीच्या परिक्षा देणार्‍या आम्हा विद्यार्थ्यांना बसतो. मुळात या दडपणात 90 टक्केच्या पुढे गुण मिळवणे हे उदिष्ट असते. आणि ट्रायल परिक्षांमध्ये गुण कमी मिळाले म्हणून दडपण अधिक वाढून आपले काही खरे नाही असे वाटते, मन कच खाते आणि अभ्यासच करावासा वाटत नाही. असेच घडते विद्यार्थ्यांच्या जीवनात. परंतु या दडपणाचा विचार ना शिक्षक करतात ना पालक याचे अधिक वाईट वाटते.

गावकडच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न अधिक वेगळे आहेत. दहावी/ बारावी पास झाल्यानंतर पुढे काय? हा प्रश्न त्यांना पडलेला असतो तर अनेकांकडून सर्रास हा प्रश्न अधिकच विचारला जातो. याबरोबरच तू हे कर, तु ते कर असे काही सल्ले भेटणार्‍या प्रत्येकाकडून मिळतात. या सगळ्यामुळे मनात खूप सार कन्फयुजन होतात. त्यात आई-वडिलांच्या अपेक्षा वेगळ्या. काही जणांना तर आपल्याला नक्की कुठलं क्षेत्र आवडत, कुठलं क्षेत्र निवडायचं हेच माहित नसत. ते केवळ आपल्या मित्राने किंवा मैत्रिणीने अमुक क्षेत्र निवडले मग मलापण तेच करायचं हे एनवेळी ठरवतात.

पण यातून प्रत्येकाला यश मिळतच असं नाही. त्यासाठी आजकाल कल चाचण्या घेतल्या जातात हा करिअर बाबत असणार्‍या कन्फयुजन वरच सोल्युशन झाले आहे . परंतु तिथपर्यंत, तज्ञांपर्यंत प्रत्येकाने पोहचले पाहिजे.

मग करिअर कस निवडायचं, तर आपल्याला आवडरे छंंद, आवडणार्‍या क्षेत्रात काम करायला सगळ्यांनाच आवडत आणि आनंद ही मिळतो, आणि त्यातून आपल्या गरजाही भागवल्या जातात, मग असं क्षेत्र निवडून त्यात प्राविण्य मिळवणंं, त्या क्षेत्राचा अभ्यास करून अनुभव मिळवणं त्यात नाव कमावणं म्हणजे करिअर. आपल्याला आवडणार्‍या क्षेत्राबद्दल माहिती मिळून.

आपल्याला त्यासाठी काय मेहनत करावी लागेल किंवा कश्या पद्धतीने त्यात प्राविण्य मिळवू शकतो या बाबत इतरांकडून तसेच इंटरनेट वरून माहिती मिळवू त्यावर विचार आणि मित्र मैत्रिणींशी चर्च्या करून करिअरची अचूक निवड करू शकतो. त्याच बरोबर आपल्या कल्पनांना वास्तवाची मेहनतीची अभ्यासची जोड देऊन. सहनशीलता, जिद्द आणि सात्यतता यामुळे आपण नक्कीच चांगल्या प्रकारे करिअर घडवू शकतो.

 

गीतांजली जगताप, विद्यार्थी, एफवायबीएस, केटीएचएम नाशिक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!