विरोधकांचा प्रचार तत्थहीन मुद्दयावर : पवार

0
नाशिक । संस्थेचे सर्वात मोठे केटीएचएम महाविद्यालयाची जागा कोणत्या खासगी व्यक्तींनी दिलेली नाही. तर ती जागा महसूल विभागाकडून संपादित केलेली आहे. त्यामुळे विरोधाकांचे आरोप खोटे आणि तत्थहीन असून खोटा प्रचार करण्यात ते हूशार आहे.

असा टोला मविप्रच्या विद्यमान सरचिटणीस नीलिमा पवार यांनी विरोधकांना लगावला. प्रगती पॅनलचा रविवारी कळवण तालुक्यातील पाळे, देवळा, पिंपळगाव वाखारी, मराळे येथील प्रचार दौरा झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. पवार म्हणाल्या, स्वत:च्या शैक्षणिक संस्था असलेली सभासद मंडळी प्रचारात वाटेल ते आरोप करत सुटली आहेत.

त्यांनी अगोदर मविप्र समाजाकरिता योगदान द्यावे व नंतरच बोलावे, असे आवाहन केले. संस्थेचे खासगीकरण कोणीही करू शकत नाही. पाच वर्षांमधील केलेली विकासकामे, शैक्षणिक प्रगती यामुळे विरोधक सैरभैर झालेले दिसतात. खोटे आरोप करण्यापलीकडे त्यांना दुसरे कामच शिल्लक नसल्याची टीका पवार यांनी केली आहे.

याप्रसंगी नारायण हिरे, बाबूराव पगार, कौतिक पगार, धनंजय पवार, सुधाकर पगार, अ‍ॅड. संजय पवार, राजेंद्र पवार, रामचंद्र बापू पाटील, अ‍ॅड. शशिकांत पवार, श्रीराम शेटे, डॉ. प्रशांत पाटील, वाय. एस. पाटील, मधुकर पगार, रवींद्र देवरे, रावसाहेब शिंदे, राजेेंद्र पवार, पी. व्ही. पवार, शरद गुंंजाळ, पोपट पाटील, राजेंद्र भामरे, हेमंत बोरसे, के. डी. पाटील, संजय पवार, रामदास पाटील, संतोष पवार, रवींद्र बोरसे, रवींद्र पगार, ऍड. परशुअण्णा पगार, गंगाधर गुंजाळ यांच्यासह सभासद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*