‘समृद्धी’ बाधित शेतकऱ्यांनी स्वत:च रचले स्वतःचे सरण; समृद्धीविरोध कायम

0
सिन्नर | शासनाकडून नुकतेच समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जागेचे दर निश्चित करण्यात आले होते. मात्र येथील शेतकऱ्यांनी काल(दि.०८) रोजी शासनाच्या दरपत्रकांची होळी करत समृद्धी विरोध कायम ठेवला आहे.

आजही सिन्नर तालुक्यातील शिवडे येथे उत्तम हरक, किरण हरक, नंदू शेळके, अरुण हरक यांनी त्यांच्या शेतात स्वतःच स्वतःचे सरण रचत समृद्धीचा विरोध केला आहे.

येथील शेतकऱ्यांचा रोजगार त्यांची उपजीविका ही शेतीवर अवलंबून आहे. त्यांची नाळ जमिनीशी जोडलेली आहे. शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा शासनाचा डाव उधळून लावला जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातून 31 केसेस हायकोर्टात दाखल केलेल्या आहेत.

तसेच शासनाने पर्यायी मार्गाचा विचार करावा अन्यथा शेतकरी सामुदायिक आत्महत्या करतील असा इशाराच येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.

आमच्या बागायती जमिनी सरकार जिरायती करून शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातुन समृद्धीचा मार्ग बदलावा असेही येथील शेतकरी सांगत आहेत.

LEAVE A REPLY

*