Friday, April 26, 2024
Homeनाशिक६५ लाख लोकसंख्येत फक्त तीन रुग्ण व्हेंटिलेटरवर; मोठया आकडयांनी लोकांमध्ये भय

६५ लाख लोकसंख्येत फक्त तीन रुग्ण व्हेंटिलेटरवर; मोठया आकडयांनी लोकांमध्ये भय

पालकमंत्री भुजबळ ; कोव्हिड आढावा बैठक

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्याची लोकसंख्या ही ६५ लाख असून करोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या केवळ ३८० रुग्ण इतकी आहे. त्यातही फक्त ३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १६ रुग्ण आॅक्सिजनवर आहे. मात्र, रुग्णांचे मोठे आकडे दाखवले जात असून त्यामुळे लोकांमध्ये भय पहायला मिळते, असे सांगत जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केला.

- Advertisement -

गुरुवारी (दि.४) जिल्हाधिकारी कार्यालयात कोव्हिड व चक्रीवादळ नूकसान बैठक घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. करोना साथ आल्यावर पहिला महिना गोंधळात गेला. त्यानंतर शासनाने रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या. मात्र, आता जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात असून करोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या ६५ लाख लोकसंख्येत ३८० इतकी आहे.

लाॅकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर रुग्ण संख्या वाढत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. पुढिल काळात दुकाने, कारखाने सर्व सुरळित होत असून अर्थचक्र पुर्वपदावर येइल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतीचे नूकसान

चक्रिवादाळामुळे शेतीचे मोठे नूकसान झाले असून पोल्ट्री फर्म, पाॅली हाउस व घरांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत व्हिसी झाली असून जिल्हाधिकार्‍यांना सूचना दिल्याचे भुजबळांनी सांगितले.

भाजपला टोला

मुख्यमंत्री ठाकरे चांगले काम करत असून न्यूज चॅनेलच्या सर्वेत बेस्ट सीएम म्हणून ते पाचव्या स्थानी आहे. मात्र भाजपचे मुख्यमंत्री कार्यक्षम असतांना देखील त्यांना पहिल्या दहामध्ये स्थान मिळाले नाही असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या