Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

तिसऱ्या यादीतही खडसे, तावडे, बावनकुळे, राणेंची नावं नाहीत

Share

मुंबई | प्रतिनिधी

भाजपची तिसरी यादी आज सायंकाळी जाहीर करण्यात आली आहे. या यादीतही ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव आले नाही. यासोबतच विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, राज पुरोहित आणि प्रकाश मेहता यांचीही नावे न आल्याने भाजपने बड्या नेत्यांचा पत्ता कट केल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसे यांचे नाव पुढील यादीत येईल अशी शक्यता वर्तविली होती. मात्र, नाव न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

भाजपने आज तिसरी यादी जाहीर केली. त्यात केवळ चार उमेदवारांची नावे आहेत. शिरपूरमधून काशीराम पावरा, रामटेकमधून मल्लिकार्जुन रेड्डी, साकोलीतून परिणय फुके आणि मालाड पश्चिममधून रमेश सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

तर तिसऱ्या यादीतील चार मिळून एकूण १४३ उमेदवारांची नवे आतापर्यंत जाहीर झाली आहेत. तिसरी यादी आली तरी त्यात खडसे, तावडे, बावनकुळे, मेहता आणि पुरोहित यांची नाव नसल्याने त्यांचे राजकीय भवितव्यही टांगणीला लागले आहे.

खडसे यांनी पक्षाकडून उमेदवारी न मिळण्याची शक्यता पाहून आधीच अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. दरम्यान, ‘मुक्ताईनगरमधून तुमच्याऐवजी अन्य एखाद्या व्यक्तीचे नाव सुचवा असे पक्षाकडून सांगण्यात आले होते. ‘इतर कोणाऐवजी मी का नको हे पक्षानं मला सांगावं,’ अशी संतप्त प्रतिक्रिया खडसे यांनी व्यक्त केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!