ऑनलाइन दाखल्यांत नगर प्रथम क्रमांकावर

0
नाशिक जिल्हा दुसर्‍या  क्रमांकावर
अहमदनगर (प्रतिनिधी)- दाखले वितरणासाठीचे विभागाचे सर्व्हर वारंवार डाउन होत असूनही नगर जिल्हा ऑनलाइन दाखले वितरणात प्रथम क्रमांकावर असून, दुसर्‍या क्रमांकावर नाशिक, जळगाव चौथ्या क्रमांकावर आहे. वारंवार डाउन होणार्‍या सर्व्हरवरून उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतून सहा लाख 19 हजार 497 दाखले वितरित झाले.
दुसर्‍या क्रमांकावरील नाशिकमधून एक लाख 70 हजार ऑनलाइन दाखले वितरण झाले आहे.
जिल्ह्यात उत्पन्न दाखले, राष्ट्रीयत्व व अधिवास, नॉन क्रिमिलेअर, स्थलांतरितांचे जात दाखले, प्रतिज्ञापत्र, सातबारा असे ऑनलाइन प्रमाणपत्रांचे वितरण झाले आहे. राज्यात प्रत्येक विभागासाठी एक सर्व्हर आहे.
राज्यात पहिल्या पाचमध्ये विभागातील तीन जिल्हे आहेत. उर्वरित दोन जिल्हे पहिल्या पंधरांत आहेत.
नगर – 1,73,682, नाशिक – 1,70,760, पुणे – 1,43,213, जळगाव – 1,34,615, यवतमाळ – 1,26,398, औरंगाबाद – 1,21,904, जालना – 1,17,620, अमरावती – 1,12,438, कोल्हापूर – 1,05,668, बीड – 97,582, बुलडाणा – 92,394, अकोला – 77,319, लातूर – 74,285, नंदुरबार – 71,012, धुळे – 69,398 याप्रमाणे विभागातून सहा लाख 19 हजार 467 दाखल्यांचे वितरण झाले.

LEAVE A REPLY

*